नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा धिक्कार : पन्हाळ्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा धिक्कार : पन्हाळ्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन
Published on

नारीशक्ती वंदन विधेयकाला
विरोध; पन्हाळ्यात आंदोलन

कळे, ता. २१ : नारी शक्ती वंदन अधिनियमासाठीचे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ न शकल्याच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील परखंदळे येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
विरोधी पक्षांचा धिक्कार असो”, “महिला सक्षमीकरणाला विरोध का0” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. आ. चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके तसेच शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख अरुण पाटील, महिला आघाडी अध्यक्षा राधिका जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. तालुक्यातील मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवून आपला तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनात पन्हाळा तालुका शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा राधिका जयवंत पाटील, अनुराधा जयकुमार पाटील, दिपाली विजयकुमार पाटील, लता पोतदार, विमल पोतदार, माया पाटील, उषा पाटील, शारदा पाटील, स्नेहलता पवार, पूजा पाटील, मंगल पाटील, शीतल पाटील, स्मिता पाटील, निर्मला पाटील, रूपाली कांबळे, उज्वला कांबळे, स्वाती पाटील, अरुणा पाटील आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com