कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणजे आमदार पी एन पाटील ः व्ही.बी.पाटील यांचे गौरवोद्गार.शिष्यवृत्ती वितरण व नागरी सत्कार कार्यक्रम.

कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणजे आमदार पी एन पाटील ः व्ही.बी.पाटील यांचे गौरवोद्गार.शिष्यवृत्ती वितरण व नागरी सत्कार कार्यक्रम.

02535
कसबा बीड : येथे आमदार पी. एन. पाटील फाउंडेशनतर्फे आमदार पी. एन. पाटील यांचा सत्कार करताना राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील. यावेळी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, प्रा. ए. डी. चौगले, बाळासाहेब खाडे व मान्यवर उपस्थित होते.

पी. एन. यांच्यामुळे कार्यकर्त्यांना बळ
व्ही. बी. पाटील : बीडशेडमध्ये नागरी सत्कार, शिष्यवृत्ती वितरण
सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड, ता. १० : आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणजे आमदार पी. एन. पाटील, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष व्ही. बी‌. पाटील यांनी काढले.
आमदार पी. एन. पाटील फाउंडेशनतर्फे आमदार पी. एन. पाटील यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेतर्फे सहकार क्षेत्रातील आदर्श नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा बीडशेड येथील महालक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या नागरी सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान व शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील होते.
आमदार, पी. एन. पाटील म्हणाले, ‘‘गेली चाळीस वर्षे केंद्रातील व राज्यातील नेत्यांचे सत्कार आम्ही करत आलो. पण, राज्यातील सहकार क्षेत्रातील थोरात पुरस्कार माझी उंची वाढविणारा आहे.’’
शिष्यवृत्ती प्राप्त १३२ विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्यात आली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार झाला. यावेळी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, उत्तम पाटील, बाळासाहेब खाडे, अनुराधा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, राहुल पाटील, बजरंग पाटील, भारत पाटील, पी. डी. धुंदरे, हिंदुराव चौगले, श्रुतिका काटकर, क्रांतिसिंह पवार, शामराव सूर्यवंशी, सत्यजित पाटील, सचिन पाटील उपस्थित होते. प्रियदर्शनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. डी. चौगुले यांनी स्वागत केले. धनाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. निवास कुंभार यांनी आभार मानले.
---------------
चौकट
पुरस्काराची रक्कम अनाथ आश्रमाला
आमदार पी. एन. पाटील यांना पुरस्कारसाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. यामध्ये स्वतःच्‍या एक लाखांची भर घालून अवनी संस्थेला एक लाख, बालकल्याण संकुल व उमेद फाउंडेशनला प्रत्येकी पन्नास हजार रुपये त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com