कोगे येथे राहत्या घरांना आग लाखोंचे नुकसान, सलग तीन घरांना आग.

कोगे येथे राहत्या घरांना आग लाखोंचे नुकसान, सलग तीन घरांना आग.

02538
कोगेः येथे घराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान व ग्रामस्थ.
...
कोगे येथे तीन घरांना आग
लाखोंचे नुकसानः प्रापंचिक साहित्य, शेती अवजारे, धान्य जळून खाक
सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड, ता.१०ः कोगे (ता.करवीर) येथे तीन राहत्या घरांना आग लागून घरातील सर्व प्रापंचिक साहित्य, शेती अवजारे, धान्य, कपडे व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोगे- बहिरेश्वर रोडवरील युवराज व नवनाथ दगडू मांगोरे यांच्या घराला प्रथम सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. कालच त्यांच्या घरात पाच हजार वाढलेले गवत भरून ठेवले होते. त्यामुळे आग लागताच काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे शेजारील दत्तात्रय महादेव मांगोरे व शामराव शंकर मिठारी यांच्या घरालाही आग लागली. सायंकाळची वेळ असल्याने ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
युवराज मांगोरे, नवनाथ मांगोरे, दत्तात्रय मांगोरे हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. जनावरांना लागणारा चारा व शेती अवजारे अशा विविध साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरातील असणारी महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. कोगे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले.
अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी बांदेकर, ड्रायव्हर अमोल शिंदे, फायरमन विशांत चव्हाण, रोहन लकडे आदी वर्दी मिळताच तत्काळ दाखल झाल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com