कसबा बीड ला सापडला दुर्मिळ सोन्याचा बेडा  मृग नक्षत्राला सोनं सापडतं याचा पुनश्च प्रत्यय.

कसबा बीड ला सापडला दुर्मिळ सोन्याचा बेडा मृग नक्षत्राला सोनं सापडतं याचा पुनश्च प्रत्यय.

02618
कसबा बीडमध्ये सापडला
वृद्धेला ‘सोन्याचा बेडा’

सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड; ता. १० ः येथे दरवर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला सोनं सापडते, याचा पुनश्च प्रत्यय आज पाहायला मिळाला. येथील बनाबाई बळवंत यादव यांना महादेवाचे दर्शन घेऊन घरी परत येत असताना ''सोन्याचा बेडा'' सापडला.
परवाच मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. यावेळी कसबा बीड परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. पाऊस झाल्यामुळे मातीतील सोन्याच्या बेडा स्पष्टपणे निदर्शनास पडतात. कधी कधी शेतात, घराच्या छतावर, ऊसाच्या पानावर, केळीच्या पानावर, जनावरांच्या विष्ठेवरही सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. बनाबाई दररोज महादेव मंदिरातील सकाळी साडेसातला आरतीला जातात. आज सकाळी आरतीनंतर घराकडे चालत जात असताना संजय खोत यांच्या घरासमोरील डांबरी रस्त्यावर बाजूपट्टीवर सोन्याचा बेडा चमकताना दिसला. या बेड्याचे वैशिष्ट्य म्हणजे बेड्याच्या दोन्ही बाजूला त्रिशूळाचा छाप आहे. ही घटना दुर्मिळ आहे. बनाबाई यांना यापूर्वी दोन वर्षांपूर्वी शेतात काम करत असताना एक बेडा सापडला आहे. आज पुन्हा सापडल्याने त्या आनंदी झाल्या आहेत. ‘सकाळ’चे अंक विक्रेते कृष्णात यादव यांच्या त्या आई आहेत. हा दुर्मिळ बेडा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी यादव यांच्या घरी गर्दी केली होती.
02618

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com