

2765
दक्ष देसाई
....
2766
कस्तुरी कदम
....
दक्ष, कस्तरी कदम
यांना सुवर्णपदक
कसबा बीड, ता. २२ ः शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील बाबूराव पुंडलिक पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची कुस्तीपटू कस्तुरी सागर कदम (कुस्ती) व धावपटू दक्ष सुहास देसाई यांनी सुवर्णपदक मिळविले. महिला कुस्तीपटू कस्तुरीने खंडाळा (जि. सातारा) येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षांखालील ४० किलो वजनीगटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. दक्ष देसाईने डेरवण (जि. रत्नागिरी) येथे झालेल्या ८० मीटर अडथळा धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकावले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. दोघांना संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, मुख्याध्यापक एस. एस. दुर्गुळे, सचिव डी. एन. पाटील व क्रीडाशिक्षक सिद्धनाथ बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.