आई वडिलांची पाद्यपूजा ही कुंभमेळ्याहून श्रेष्ठ - इंद्रजीत देशमुख.

आई वडिलांची पाद्यपूजा ही कुंभमेळ्याहून श्रेष्ठ - इंद्रजीत देशमुख.

Published on

51323

आई-वडिलांची पाद्यपूजा
कुंभमेळ्याहून श्रेष्ठ : देशमुख
कसबा बीड, ता. १४ : ‘मृत्यूनंतर आई-वडिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यापेक्षा जिवंतपणी आई-वडिलांची पाद्यपूजा करा. हे पुण्याचे काम आहे. ज्यांना कुंभमेळ्यासाठी जाता आले नाही, त्यांच्यासाठी आई-वडिलांची पाद्यपूजा कुंभमेळ्याहून श्रेष्ठ आहे,’’ असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले.
गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त देशमुख यांचे ‘पूजनीय आई-बाबा’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘‘समाजातील सामाजिक व भावनिक नाते संपत चालले आहे. कुटुंबव्यवस्था संकुचित झाली आहे. अशा परिस्थितीत माणूस जोडणं, नीतीमूल्य जपणे, आई वडिलांसह ज्येष्ठांचा आदर करणे अशा संस्कारांची समाजाला गरज आहे.’ सुरुवातीला दत्तात्रय पाटील यांचा मातृ-पितृ पाद्यपूजन कार्यक्रम झाले. यावेळी असंख्य मुला-मुलींनी आई-वडिलांची पाद्यपूजा केली. प्रास्ताविक विरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापूरे यांनी केले. राजू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील, प्रा. किसन चौगले, कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, तुकाराम पाटील, यशवंत बँक संचालक नंदकुमार पाटील, सरपंच सचिन पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, माजी पोलिसपाटील सुभाष पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील यांच्यासह विद्यार्थी - पालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com