

03475
शक्तिपीठ महामार्ग करवीरमध्ये
हाणून पाडू ः सचिन पाटील
कसबा बीडला शेतकऱ्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड ता. ७ ः ‘‘करवीरच्या पश्चिम भागात शेतकऱ्यांना मुळात जमिनी अत्यल्प आहेत. शक्तिपीठसारख्या गरज नसणाऱ्या महामार्गामुळे छोटे शेतकरी रस्त्यावर येतील. या प्रकल्पाला जिल्ह्यात इतर ठिकाणी जसा रोखला तसा करवीरमधूनही हाणून पाडू,’’ असा इशारा शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील यांनी दिला आहे.
येथील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनो पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. या रस्त्यामुळे तुमचे अस्तित्व संपून जाईल.’’ यावेळी शिवाजी माळी, मानसिंग पाटील, शरद पाटील, शिवाजी पाटील यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. बैठकीला तुळशी समूहाचे सरदार पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, अनिल सोलापुरे, रंगराव पाटील, बाळराजे पाटील, केशव भोपळे, बळवंत पाटील, विलास कुंभार यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सर्वपक्षीय नेत्यांनी रस्त्यावर उतरावे
हा केवळ एका गावाचा नव्हे, तर संपूर्ण तालुक्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळे सुपीक बागायत पट्टा उद्धवस्त होईल. शक्तिपीठ विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी रस्त्यावर उतरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पैसे मिळतील पण जमीन मिळणार नाही - उपसरपंच कृष्णात पाटील.
महामार्गात माझी ५३ गुंठे सुपीक जमीन जाणार आहे. त्यामध्ये विहीर, ३० नारळाची झाडे, २० आंबा झाडे आहेत. जमिनीच्या बदल्यात पैसे मिळतील, पण जमीन पुन्हा मिळणार नाही. पुढची पिढी आम्हाला माफ करायची नाही. असे कितीतरी लोक शक्तिपीठमुळे उद्ध्वस्त होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.