Sun, Jan 29, 2023

कबनूरमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन
कबनूरमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन
Published on : 2 January 2023, 12:13 pm
कबनूरमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन
कबनूर ः येथील बौद्ध समाज धम्म संस्कार केंद्रातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा केला. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त सेनाधिकारी विश्वनाथ शिंगे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अजित शिंदे होते. निवृत्त सेनाधिकारी विश्वनाथ शिंगे, मोहन नाईक, अजित शिंदे यांची भाषणे झाली. बाबासाहेब शिंदे, दिलीप शिंदे, अशोक अमृता कांबळे आदी उपस्थित होते. एकता ग्रुपतर्फे भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम झाला. सयाजी चव्हाण, माजी उपसरपंच नीलेश पाटील, राजू आवळे, युवराज जाधव, दीपक नरंदेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अशोक कांबळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. उपसरपंच सुधीर पाटील, बबन केटकाळे, सुधीर लिगाडे आदी उपस्थित होते.