Wed, Feb 8, 2023

नगरपरिषदेसाठी आत्मदहनाचा इशारा
नगरपरिषदेसाठी आत्मदहनाचा इशारा
Published on : 17 January 2023, 3:34 am
नगरपरिषदेसाठी
आत्मदहनाचा इशारा
कबनूर ः कबनूर स्वतंत्र नगरपरिषद मंजूर होण्यासाठी प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आंदोलन करणार आहेत. कबनूर नगरपरिषद कृती समितीचे दहा सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि दहा सदस्य मंत्रालयासमोर एक दिवसीय उपोषण करणार आहेत. पाच सदस्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याची माहिती कबनूर नगरपरिषद कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृती समितीचे अजित खुडे, उत्तम जाधव, गणेश रेणके, युवराज कांबळे, नितीन गवळी यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.