उरूस पावती बुकाचा आज प्रारंभ

उरूस पावती बुकाचा आज प्रारंभ

Published on

उरूस पावती बुकाचा आज प्रारंभ
कबनूरला नियोजनाबाबत बैठक; पाळण्याचीही निविदा उघडणार
कबनूर, ता. ८ ः येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरूस १६ मार्चला आहे. तो निर्विघ्नपणे, शांततेत व उत्साहात व्हावा, यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी सांस्कृतिक भवनमधील बैठकीत चर्चा केली. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पोवार होत्या.
बैठकीत पाळण्याचे दर वीस, तीस व चाळीस रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला. पावती, स्टील ग्रील, वाहतूक व्यवस्था, स्टॉलचे दर, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. स्टील ग्रील व देणगी पावती यावर वादाचे प्रकार घडले. उद्या (ता. ९) सकाळी दर्ग्यामध्ये श्रीफळ वाढवून पावती बुकाचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अकराला ग्रामपंचायत सभागृहात पाळण्याच्या निविदा उघडण्यात येणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद पाटील यांनी केले.
माजी उपसरपंच जंबा पाटील यांनी ग्रामपंचायतीद्वारे देणगी पावतीसाठी व्यवस्था करावी, असा मुद्दा मांडला. या मुद्द्यावरही दोन गटांत जोरात चर्चा होऊन अखेरीस देणगी पावतीबाबत मुजावर यांच्यासह ग्रामपंचायत लिपिक बसवण्यात येऊन जमा होणारी देणगी रक्कमही दर्गा सुशोभीकरण करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.
देवस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून प्रत्येकवर्षी २५ लाख रुपयांपर्यंत निधी मिळतो. मात्र दहा वर्षे काही कारणास्तव हा निधी मिळत नाही. त्यासाठी एकोप्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मत प्रमोद पाटील यांनी मांडले. उपनिरीक्षक श्री. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. चर्चेत प्रमोद पाटील, बबन केटकाळे, अजित खुडे, प्रकाश इंगवले, कुंदन आवळे, दत्ता शिंदे, उत्तम जाधव, दत्ता पाटील, महावीर लिगाडे, दिग्विजय इंगवले, नसरुद्दीन मुजावर, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर, कमाल मुजावर, रियाज चिकोडे आदींनी सहभाग घेतला.
ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे, सुधीर लिगाडे, सैफ मुजावर, समीर जमादार, प्रवीण जाधव, वैशाली कदम, सुधाराणी पाटील, रजनी गुरव, रोहिणी स्वामी आदी उपस्थित होते. उपसरपंच सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक केले.
--------
ग्रीलबाबत उरुसानंतर निर्णय
बारा वर्षांपूर्वी शिल्लक रकमेतून दर्ग्यामध्ये चांगल्या प्रकारचे स्टील ग्रील बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिल्लक रकमेतून चांगल्या प्रतीचे स्टील ग्रील खरेदी केले होते. ते तसेच आहेत. प्रमोद पाटील यांनी त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह न वापरता ग्रील बसवावे, असे मत मांडले. मात्र त्यावर एकमत न झाल्याने अखेरीस उरूस झाल्यानंतर या विषयावर एकत्रित बसून निर्णय घेण्याचे ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.