कुमार विद्यामंदिरकडून शेणीदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुमार विद्यामंदिरकडून शेणीदान
कुमार विद्यामंदिरकडून शेणीदान

कुमार विद्यामंदिरकडून शेणीदान

sakal_logo
By

03325
चंदूर ः येथील कुमार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी विवेकानंद फाउंडेशनच्या शणीदान उपक्रमास शेणी दिल्या.
------------
कुमार विद्यामंदिरकडून शेणीदान
कबनूर ः चंदूर (ता. हातकणंगले) येथील कुमार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी होळीनिमित्त कबनूरमधील विवेकानंद फाउंडेशनच्या शेणीदान उपक्रमाला हातभार लावला. त्यांनी २०० शेणी दान केल्या. विद्यार्थ्यांनी होळीत शेणी जाळण्याऐवजी या सामाजिक उपक्रमास दिल्या. विवेकानंद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, उपाध्यक्ष उत्तम जाधव, केंद्रप्रमुख विजय चौगुले, शिक्षक संजय चव्हाण, प्रतिभा आदर्शे, कस्तुरी बारवाडे, अश्विनी पोतदार आदी उपस्थित होते.
-----------
05019
जयसिंगपूर : येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
------
जयसिंगपूरमध्ये काँग्रेसतर्फे निदर्शने
जयसिंगपूर : भारतीय स्टेट बँकेचे २७ हजार कोटी बुडवल्याचा आरोप करत अदानी यांच्या विरोधात व त्यांना पाठीशी घालणाऱ्‍या मोदी सरकारविरोधात येथील भारतीय स्टेट बँकेसमोर गुरुवारी (ता.९) काँग्रेसतर्फे निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बागे यांनी केले. श्री बागे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. तालुकाध्यक्ष वसीम जमादार, जयदीप थोरात, विद्यार्थी काँग्रेसचे वीरेंद्रसिंह निकम, प्रकाश देसाई, गुरुप्रसाद धनवडे, संभाजी कांबळे आदी उपस्थित होते.