कबनूरला उरुसास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरला उरुसास प्रारंभ
कबनूरला उरुसास प्रारंभ

कबनूरला उरुसास प्रारंभ

sakal_logo
By

03355
कबनूर ः येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. (छायाचित्र ः पल्लवी फोटो, कबनूर)
------------
कबनूरला उरुसास प्रारंभ
कबनूर, ता. १६ ः येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसास पारंपरिक पद्धतीने धार्मिक वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो भाविकांनी पहाटेपासून रांग लावून दर्शन घेतले.
बुधवारी (ता. १५) रात्री बारा वाजून एक मिनिटांनी गंधरात्र झाली. त्यानंतर पाणी घालणे, दंडवत घालणे आणि दर्शनास भाविक भक्तांनी रांगा लावल्या. अनेक भाविकांनी गलेफ घातला. बुधवारी मिराज वार्शी, दिल्ली विरुद्ध शिराज चिश्ते अहमदाबाद यांचा कव्वालीचा मुकाबला झाला. उरुसानिमित्त साखर, उद, नारळ, तोरण यांच्या दुकानात गर्दी झाली. खेळण्याची दुकाने त्याचबरोबर पाळण्याच्या ठिकाणी गर्दी झाली. भक्तिमय वातावरणात शांततेत उरुसास प्रारंभ झाला.