कबनूरला नळाचे पाणी गटारीत

कबनूरला नळाचे पाणी गटारीत

03407
कबनूर ः येथील कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केलेल्या नळाचे पाणी तोटी नसल्याने थेट गटारात जाऊन पाण्याची नासाडी होत आहे.
------------
कबनूरला नळाचे पाणी गटारात
तोटी नसल्याचा परिणाम; पाण्याच्या नासाडीने नागरिकांतून संताप
रवींद्र पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. १० ः ऐन उन्हाळ्यात नागरिकांना कूपनलिकेतून पाणीपुरवठा केलेल्या नळाच्या कनेक्शनला तोटी नसल्याने पाणी थेट गटारात जात आहे. उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असताना पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
येथे नागरिकांना जलस्वराज्य प्रकल्पातून पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याचे ठरवले. प्रभागामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी चांगला रस्ता उकरला. उकरलेल्या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर कूपनलिकेतून नियोजनबद्ध नळ कनेक्शन दिलेले नाही. काही ठिकाणी तर लोक थेट चावीला पाईप लावून पाणी घेतात. त्याचबरोबर पाणी सोडण्याच्या वेळाही ठरलेल्या नाहीत. तसेच काही ठिकाणी नळांना तोट्याच नाहीत, तर काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाणी वाया जात आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन नियोजन करून पाणीपुरवठा करावा. ग्रामपंचायतीने प्रत्येक प्रभागात वेळ ठरवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फतच पाणी सुरू ठेवावे तसेच बंद करावे. वाया जात असलेले पाणी थांबवावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
----------
नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून कूपनलिकेतून नळ कनेक्शन दिले आहे. नळ कनेक्शनच्या चाव्या खराब झाल्या असतील तर बदलण्यात येतील. रस्त्यांचीही दुरुस्ती करून घेण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फतच वेळा ठरवून पाणीपुरवठा करू.
-शोभा पोवार, सरपंच, कबनूर ग्रामपंचायत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com