पथदिव्यांच्या जोडणीस मंजुरी द्यावी

पथदिव्यांच्या जोडणीस मंजुरी द्यावी

Published on

03617
कबनूर ः येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये पथदिव्यांच्या जोडणीस मंजुरी मिळावी. या मागणीचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना शोभा पोवार, सुधीर लिगाडे, सुधीर पाटील आदिंनी दिले.
----
पथदिव्यांच्या जोडणीस मंजुरी द्यावी
कबनूर प्रभाग क्रमांक एकमधील सदस्य, ग्रामस्थांची मागणी
कबनूर, ता. २ ः येथील प्रभाग क्रमांक एकमधील पथदिव्यांच्या जोडणीस मंजुरी मिळावी. याबाबत या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी इचलकरंजी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, ‘आम्ही ग्रामपंचायत सदस्य व व चाळीस वर्षे कायम रहिवाशी ग्रामस्थ असून कबनूरमधील प्रभाग क्रमांक एकमधील लक्ष्मी माळ व जयहिंद नगर परिसरात अद्यापही पथदिव्यांची सुविधा नाही. येथे वारंवार रस्त्यावरील अपघात, चोरी, महिलांची छेडछाड यामध्ये वाढ होत असून या परिसरात पथदिवे जोडणी करणे अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून कामासाठी तरतूद केली आहे. तरी आपल्याकडून पथदिवे जोडणी मंजुरी मिळावी.’ निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना सरपंच शोभा पोवार, ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, सुधीर पाटील, सुनीता आडके, समीर जमादार, मनोहर मणेरे आदींनी दिले. निवेदनावर रमेश पाटील, सुशांत पाटील, मनिषा आडमुठे, सुषमा चव्हाण, पांडुरंग तळेकर आदींच्या आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.