

04340
कबनूर : येथे उरुसानिमित्त आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार
---------
समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करा
पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार : कबनूरला उरुसानिमित्त बैठक
सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ३ : करमणुकीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन सामाजजागृती व समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम उरुसानिमित्त आयोजित करावेत, असे प्रतिपादन शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी केले.
कबनूर उरुसानिमित्त विठ्ठल मंदिर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. तहसीलदार म्हणाले, ‘धार्मिक कार्यक्रमात कोणती अडचण येणार नाही परंतु सर्व नियोजन हे कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे लागेल.’ अपर तहसीलदार सुनील शेरखाने म्हणाले, ‘विविध कारणांसाठी लागणारे परवाने व महसूल विभागाचे लागणारे सहकार्य विभाग करेल.’ उरुसाचे स्वरूप काय असावे? याबद्दल शकील मुजावर, अजित खुडे, उत्तम जाधव, दत्ता शिंदे, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर यांनी मते मांडली. डिजीटल बोर्डमुक्त, महिलांना सबलीकरण करणारे, विद्यार्थी व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम करावेत. याबाबत गुरुवारी (ता. ७ मार्च) बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
उपसरपंच सुधीर लिगाडे, शांतिनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद कोले, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, माजी सरपंच मधुकर मणेरे, सुधीर पाटील, समीर जमादार यांनी मते मांडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर, अर्चना पाटील, रजनी गुरव, आदी उपस्थित होते. सरपंच शोभा पोवार यांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.