५२ वर्षानंतर नव्याने जुळल्या ऋणानुबंधाच्या गाठी

५२ वर्षानंतर नव्याने जुळल्या ऋणानुबंधाच्या गाठी

04441
५२ वर्षांनंतर जुळल्या
ऋणानुबंधाच्या गाठी

रुकडी डीएड बॅचचा स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा

कबनूर ता. ११ ः ज्या सोबत्यांसोबत आपण शिकलो आणि वाढलो, ते जिवाभावाचे सोबती ५२ वर्षानंतर एकमेकांना भेटले तर बसणारा सुखद धक्का कसा असेल, याचा अनुभव १९७१-७२ या शैक्षणिक वर्षातील रुकडीच्या छत्रपती शाहू अध्यापक विद्यालयाच्या बॅचने घेतला. येथे गंगानगरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरीभाऊ जगताप होते.
नारायण कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी गेली दोन वर्षे अविरत प्रयत्न करून कॉलेजच्या जनरल रजिस्टर मधून पत्ता मिळवण्यापासून ते संबंधित व्यक्तीला संपर्क करण्यापर्यंतचे कठीण काम पूर्ण करून ५२ वर्षानंतर ४० मित्रांना एकत्र आणण्याचे आव्हान पूर्ण केले. यशाचे गौरीशंकर जरी गाठले तरी त्याची सुरुवात रुकडी डीएड कॉलेजपासून झाली हे सांगायला कोणीच विसरले नाही. सत्तरी ओलांडलेले सोबती अडचणी बाजूला ठेवून, ‘जरा विसाऊ या वळणावर...’ असे गीत गातच अनोख्या स्नेहमेळाव्याला जमले होते. या बॅचला शिकवणारे प्रा. रामचंद्र परीट यांचा सत्कार केला. स्नेह मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून मित्र-परिवार उपस्थित झाला होता. यापुढेही वर्षातून किमान एकदा भेटण्याचा संकल्प करून कमिटी स्थापन करून स्नेहमेळावा यशस्वीपणे झाला.
चौकट
अन् डोळ्यांच्या कडा ओलावल्या....
शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर ही मंडळी जीवनाची संध्याकाळ अनुभवत आहेत. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण एकमेकांना भेटतो याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याचवेळी आपल्या बॅचचे काही सोबती आपल्याला सोडून निघून गेले आहेत हे समजल्यावर या मित्रांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com