पंचगंगा कारखान्याचे सभासदांना नऊ ऑक्टोबर पासून सवलतीच्या दरातील साखरेचे वाटप

पंचगंगा कारखान्याचे सभासदांना नऊ ऑक्टोबर पासून सवलतीच्या दरातील साखरेचे वाटप

Published on

‘पंचगंगा’चे सवलतीतील
साखर वाटप ९ पासून
कबनूर ता. ४ ः येथील गंगानगरमधील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री.रेणुका शुगर्स या कारखान्याच्या ''अ'' वर्ग व ''ब'' वर्ग सभासदांना सवलतीच्या दरातील साखरेचे वाटप ९ आॕक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर होणार आहे, अशी माहिती कारखान्याने पत्रकाद्वारे दिली आहे.
२०२३-२०२४ मध्ये ज्या ''अ'' वर्ग ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यास ऊसपुरवठा केलेला आहे त्यांना व ''ब'' वर्ग सभासदांना प्रथम शेअरला २० किलो व पुढील प्रत्येक शेअरला ५ किलो याप्रमाणे तसेच ज्यांनी ऊस पुरवठा केलेला नाही अशा सभासदांना प्रथम शेअरला १५ किलो व पुढील प्रत्येक शेअरला ५ किलो साखर प्रतिकिलो १५ रुपये दराने देण्यात येईल. सभासदाना ओळखपत्राशिवाय साखर दिली जाणार नाही.जे सभासद येवू शकणार नाहीत त्यानी अधिकारपत्र देणेचे आहे.अधिकारपत्र हजर करणाऱ्याने त्या सभासदाचे व स्वतःचे ओळखपत्र दिलेशिवाय साखर दिली जाणार नाही.साखरेची रक्कम ए.टी.एम. कार्ड/डेबीट कार्डाद्वारे अथवा रोखीने स्वीकारली जाणार आहे.साखर वाटपाची मुदत संपलेवर कोणत्याही सबबीवर साखर दिली जाणार नाही. साखर वाटप सकाळी ९ ते सायं. ५ वेळेत सुरू राहील. हे वाटप दर रविवारी व दसरा (ता. १२) व १ नोव्हेंबर व २ नोव्हेंबरला दीपावलीनिमित्त बंद राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com