‘खो-खो’त पुरुष विभागात डांगे महाविद्यालय प्रथम

‘खो-खो’त पुरुष विभागात डांगे  महाविद्यालय प्रथम
Published on

4880
इचलकरंजी ः शिवाजी विद्यापीठअंतर्गत कोल्हापूर विभागीय खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या खो-खो संघास पारितोषिक देताना मान्यवर
............
‘खो-खो’त पुरुष विभागात
डांगे महाविद्यालय प्रथम
कबनूर, ता. २२ ः कोल्हापूर विभागीय खो-खो स्पर्धेत पुरुष विभागात हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या खो-खो संघाने नाईट कॉलेज इचलकरंजीच्या संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. एस. के. पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठअंतर्गत इचलकरंजीतील जय हिंद मंडळच्या मैदानावर स्पर्धा झाल्या.
विजयी डांगे महाविद्यालयाच्या संघाला मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संघाची शिवाजी विद्यापीठअंतर्गत आंतरविभागीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघात कैवल्य कुंभार, शैलेश संकपाळ, प्रथमेश संकपाळ, ऋषिकेश पांढरकोटे, विनायक मल्ल्या, हर्ष पाटील, अमन मुल्ला, आकाश नायकल, आदित्य आंबोळे, नवनाथ जाधव, शैलेश सुतार, राहुल माने, सौरभ कोरवी, भैरव काळे आदींचा समावेश होता. संघाला संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब डांगे, सचिव ॲड. राजेंद्र डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे, खजिनदार विठ्ठलराव मुसाई, प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी यांचे प्रोत्साहन तसेच क्रीडाशिक्षक प्रा. रमेश पाटील, प्रा. संदीप लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com