तत्कालीन सरपंच व सदस्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश

तत्कालीन सरपंच व सदस्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश

Published on

अपात्रताप्रकरणी
उद्या सुनावणी
कबनूर : कबनूर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ नुसार कारवाईच्या अनुषंगाने सोमवारी ( ता. ९) सकाळी अकराला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होईल. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह उपस्थित राहून तोंडी व लेखी म्हणणे तीन प्रतींत सादर करावे; असे लेखी आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सरपंच व सदस्यांना दिले आहेत. अनुपस्थित राहिल्यास आपणास काही सांगायचे नाही असे समजून पुढील योग्य ती कारवाई होईल, असे आदेशात म्हटले आहे. रियाज चिकोडे यांनी तत्कालीन सरपंच शोभा पोवार यांनी स्वतःच्या वीस वर्षांपूर्वीच्या घराचा बांधकाम परवाना घेताना अधिकारांचे उल्लंघन व नियमबाह्य कामकाज केले आहे. त्यामुळे चिकोडे यांनी ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ प्रमाणे सरपंच पोवार यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी; अशी तक्रार पुणे विभागीय आयुक्तांकडे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com