सिकंदर शेखकडून इराणचा हबीब चितपट
5285, 5284
कबनूर ः कुस्तीप्रेमी नागरिक समितीच्यावतीने येथे ग्रामदैवत जंदीसो व ब्रॉनसो उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीतील विजेता सिंकदर शेखला चांदीची गदा देऊन गौरविताना आमदार अशोकराव माने, अशोक स्वामी, अशोक पाटील बी. डी. मिलिंद कोले आदी. दुसऱ्या छायाचित्रात मैदानातील अटीतटीचा क्षण. (छायाचित्र ः पल्लवी फोटो, कबनूर)
.................
सिकंदर शेखकडून इराणचा हबीब चितपट
कबनूरला उरुसानिमित्त कुस्ती मैदान ः महिलांच्या लढतीत प्रतिभा कांबळे विजेती
सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ३० ः येथील कुस्तीप्रेमी नागरिक समितीच्यावतीने आयोजित ग्रामदैवत जंदीसो व ब्रॉनसो उरुसानिमित्त शनिवार झालेल्या निकाली कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने इराणच्या हबीब इसानीला सिंगल निरसन एकेरी कस डावावर चितपट केले. विजेत्या सिकंदरला देवगोंडा बाळगोंडा पाटील (वस्ताद) यांच्या स्मरणार्थ अशोक देवगोंडा पाटील यांच्याकडून आमदार अशोकराव माने यांच्याहस्ते चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आंतरराष्ट्रीय चॅम्पियन पैलवान सालार इसानीने भारत केसरी अमित कुमारला फंट सालतो डावावर अस्मान दाखविले. महान भारत केसरी माऊली जमदाडेने उत्तर प्रदेश केसरी पैलवान जितेंद्र कुमारला पराभूत केले. पंजाबचा पैलवान गुरुजंटने लक्षवेधी कुस्ती करत इराणच्या मिलाद इराणीला अस्मान दाखविले.
महिलांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत इचलकरंजीच्या प्रतिभा कांबळेने नसलापूर (कर्नाटक) च्या श्रेया पाटीलला पराभूत केले. कबनूरच्या जागृती पाटीलने अटीतटीची लढत देऊन इचलकरंजीच्या बिशाली यादववर विजय मिळवला. इचलकरंजीची पैलवान ऋतुजा संकपाळ विरुद्ध अंकली (कर्नाटक) व मानसी कोरे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. दरम्यान महिलांच्या दहा कुस्त्या झाल्या.
यावेळी आमदार अशोकराव माने, हिंद केसरी दीनानाथ सिंह, डबल महाराष्ट्र केसरी रामा माने, अशोकराव पाटील, शांतिनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद कोले, ज्येष्ठ नेते बी. डी. पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय चौगुले, अशोक स्वामी, माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे, सुहास जांभळे, सुनील काडाप्पा, सैफ मुजावर, राहुल कांबळे, दिलीप मुथा, नीलेश पाटील, बाबू दांडगे, सुधाकर कुलकर्णी, अभिजित भरमगोंडा, राजू सुतार, कोतवाल शिवाजी चव्हाण, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.
पंच म्हणून सचिन पुजारी, अण्णासाहेब निंबाळकर, संजय सुतार, महिपती केसरे, बाळू शिंदे, गुंडा पाटील, प्रवीण कोळी, बबन दानोळे, ओंकार भातमारे, सचिन जामदार आदींनी काम पाहिले. प्रा. आप्पासो वाघमारे, धनाजी मदने, सुकुमार माळी यांनी कुस्तीचे समालोचन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.