Mon, March 27, 2023

कसबा सांगाव: दोन तोळ्याचे सोन्याचे घंटन लंपास
कसबा सांगाव: दोन तोळ्याचे सोन्याचे घंटन लंपास
Published on : 15 March 2023, 6:55 am
कसबा सांगावातून
गंठण लांबविले
कसबा सांगाव ः येथील महावीरनगर परिसरातील एका घराचा बंद दरवाजा उघडून बेडरूममधील तिजोरीतून दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण अज्ञाताने लांबविले. ही घटना मंगळवारी (ता.१४) सायंकाळी घडली. संध्या रावसाहेब घड्याळे यांनी याबाबतची फिर्याद कागल पोलिसांत दिली आहे. महावीरनगर, चौगुले मळा येथे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संध्या घड्याळे घराचे दार बंद करून शेजारील घराच्या कट्ट्यावर बोलत बसल्या होत्या. त्याचवेळी अज्ञाताने सोन्याचा ऐवज लंपास केला. जुन्या हिरव्या रंगाच्या बॉक्सर दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.