कसबा सांगाव: मूलभूत सुविधा तात्काळ पूर्ण करा...ग्रामस्थांची मागणी

कसबा सांगाव: मूलभूत सुविधा तात्काळ पूर्ण करा...ग्रामस्थांची मागणी

मूलभूत समस्यांबाबत निवेदन
कसबा सांगाव ः प्रभाग क्रमांक पाचमधील अंतर्गत रस्ता, गटारी, पाणीपुरवठ्यासह घंटागाडीची सुविधा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीला दिले आहे. प्रभाग पाचमधील दादासो मगदूम यांच्या घरापासून सुरू होणारा रस्ता अत्यंत खराब आहे. याच रस्त्याच्या एका बाजूचे गटार काँक्रीटचे केले मात्र दुसऱ्या बाजूचे गटार केलेले नाही. यामुळे रस्त्यावर पाणी साचते. पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. कचरा गोळा करण्यासाठी आठवड्यातून किमान तीन दिवस घंटागाडी सुरू करावी. याच गल्लीतील वळणावर काँक्रीटीकरण करून वाहतुकीस होणारा अडथळा सुरळीत करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. अजित पाटील, शरद वंदुरे, युवराज मोहिते, शुभम वदुरे, ओम पाटील, दीपक वंदुरे, अशोक वंदुरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. दरम्यान रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पाणीपुरवठ्याचे काम अद्यापही सुरू आहे. लवकरच उपाययोजना करू, असे ग्रामपंचायतीने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com