कसबा सांगाव: मुक्त गोठा करा, जनावरांचे आजार टाळा.....डॉ ए बी चौगुले कसबा सांगाव येथे गोकुळ मार्फत वंध्यत्व निवारण शिबिर

कसबा सांगाव: मुक्त गोठा करा, जनावरांचे आजार टाळा.....डॉ ए बी चौगुले कसबा सांगाव येथे गोकुळ मार्फत वंध्यत्व निवारण शिबिर

01255
कसबा सांगावला जनावरे
वंध्यत्व निवारण शिबिर

कसबा सांगाव, ता. १७ ः जिल्हयात जनावरांसाठी आवश्यक वैरणीचे उत्पादन चांगले आहे. जनावरांचे संतुलित आहार व्यवस्थापन व वासरु संगोपन योग्यरीत्या करणे गरजेचे आहे. मुक्त गोठा पद्धत करा आणि जनावरांचे आजार टाळा; असे आवाहन गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. ए. बी. पाटील यांनी केले.
कसबा सांगाव (ता. कागल) येथे गोकुळ दुध संघामार्फत जनावरांच्या वंध्यत्व निवारण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते. अंबरिष घाटगे प्रमुख उपस्थित होते.
डाॅ.पाटील म्हणाले, ‘मुक्त गोठ्यामुळे जनावरांचा चांगला व्यायाम होतो. जनावरांना चोवीस तास एकाच जागी बांधून ठेवल्याने त्यांना शारीरिक व्याधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. व्यायामाच्या अभावामुळे जनावरे गाभण राहणे, नियमित दूध देण्याबाबत वारंवार तक्रारी होतात. वर्षातून दोनवेळा जंतनिर्मूलन व लसीकरण केले पाहिजे. दररोज मिनरल मिक्चर खाद्य दिल्यास जनावरांच्या तक्रारी कमी होतात. शेतकऱ्यांनी जातीवंत जनावरांची पैदास करावी त्यामुळे इतर राज्यातून जनावरे आणण्याची वेळ येणार नाही.’ युवराज पाटील म्हणाले, ‘दोन महिन्यांत तालुक्यातील प्रत्येक गावात वांझ जनावरे दुधावर आणण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रम होईल. अंबरिष घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वांझ जनावरांची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. ए .पाटील यांनी तपासणी करून औषधोपचार केले. यावेळी प्रकाश शिंगारे, दिपक चौगले, प्रभु भोजे, कुमार चौगुले, संभाजी कोपार्डे, प्रवीण पाटील, किरण पास्ते आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com