

01283
‘दूधगंगा बचाव’तर्फे
सुळकूडला पुतळा दहन
‘त्या’ लोकप्रतिनिधींचा निषेध
कसबा सांगाव, ता. ३ : प्रस्तावित इचलकरंजी पाणी योजनेबाबत इचलकरंजीतील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांची बैठक कोल्हापुरात झाली. येथे लोकप्रतिनिधीनी केलेली वक्तव्ये आणि त्यांच्या भूमिकेचा सुळकुडला दूधगंगा बचाव कृती समितीतर्फे निषेध करण्यात आला. आम्ही पाकिस्तानात राहतो का, असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी दूधगंगा नदीकाठही भारतात राहतो हे विसरू नये, असे जोरदार प्रत्युत्तर सुळकूडमधील निषेध आंदोलनात देण्यात आले. स्वतःचे लाभ क्षेत्र सोडून दुसऱ्यांच्या लाभ क्षेत्रातील पाण्यावर हक्क सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पुतळ्याचे दहन करून निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली.
दूधगंगा धरणातील पाणीसाठा शिल्लक आहे असे सांगताना वारणा धरणातील पाणीसाठ्याबाबत काहीच बोलत नाहीत. वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी योजना मंजूर झाली होती ती कशामुळे रद्द झाली, याचा विचार होणे गरजेचे आहे. दूधगंगा नदीतून योजना होवू नये ही दूधगंगा नदीकाठची जनभावना आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी काही लोक जाणीवपूर्वक योजनेला पाठबळ देत आहेत. हे निषेधार्ह आहे. वारणा नदीकाठावरील दानोळीला एक आणि सुळकुड नदीकाठच्या गावांना वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. योजनेविरोधात भूमिका घेतलेल्या कागलच्या नेत्यांचा अपमान करू नये, असा इशारा देत नदीकाठ कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या मागे ठामपणे उभा आहे. ही योजना रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला. अमोल शिवई, मनोज कोडोले, बाळासो पाटील, चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शरद धुलुगडे, युवराज पाटिल, बाबसो पाटिल, सचिन भोसले, भीमगोंडा सरदार, अमित कतगर, बाबया स्वामी, शिवाजी लगारे, आणासो पाटील, टी. ए. वानी, सचिन परीट आदींसह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.