कसबा सांगाव: विवाह सोहळ्यात घेतली मतदानाची शपथ, प्रशासनाकडून अनोखा उपक्रम

कसबा सांगाव: विवाह सोहळ्यात घेतली मतदानाची शपथ, प्रशासनाकडून अनोखा उपक्रम

01506
विवाह सोहळ्यात
मतदानाची शपथ
कसबा सांगाव, ता. २ ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने स्वीप प्रकल्प तयार केलेला असून मतदार शिक्षण, मतदार जनजागृती आणि मतदार साक्षरतेसह १०० टक्के मतदान होण्याकरिता प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या उपस्थितीत कागल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे कागल यांनी अनोखा उपक्रम राबविला. कसबा सांगाव येथील वाकी वसाहत परिसरातील संतोष पांडुरंग चव्हाण यांच्या लग्न समारंभात उपस्थित वऱ्हाडी मंडळींना शंभर टक्के मतदान करण्याविषयीची शपथ देण्यात आली. या उपक्रमास वधू वरांच्या पै पाहुणे, नातेवाईक आणि मित्र मंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसो उपतहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे हे विविध माध्यमातून मतदान जनजागृती करत आहेत. एक मे रोजी सर्व मतदारांनी ऑनलाइन शपथ,शाळा स्तरावरती प्रतिज्ञा, रांगोळ्या, बॅनर सह प्रभातफेऱ्या, गृह भेटी यांचे आयोजन केले गेले. कासोटे यांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम करून सर्वांचे लक्ष वेधले. सरपंच ॲड वीरश्री जाधव, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत कोळी, प्रवीण माळी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com