कसबा सांगाव परिसरात मोबाईलधारक त्रस्त

कसबा सांगाव परिसरात मोबाईलधारक त्रस्त

कसबा सांगाव परिसरात मोबाईलधारक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. १४ ः कसबा सांगाव परिसरात मोबाईल रेंजची समस्या सातत्याने भेडसावत आहे. ५-जीच्या नेटवर्कचे मोठे जाळे निर्माण करणाऱ्या जिओ कंपनीच्या खंडित नेटवर्कमुळे ग्राहकातून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात अनेक मोबाईल कंपन्यांचे भले मोठे टॉवर आहेत. मात्र रेंजच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या नेटवर्कमुळे ऑनलाईन कामे करणाऱ्या अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कसबा सांगावच्या हद्दीत तीन-चार मोठे मोबाईल टॉवर आहेत. विविध मोबाईल कंपन्या वेगवेगळ्या आणि आकर्षक जाहिराती करून ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. ग्राहकही विविध ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, नेटवर्कची समस्या मोबाईल कंपन्या सोडवू शकत नाहीत. इंटरनेट, पर्सनल बँकिंग, वेब सर्फिंग, व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाद्वारे अनेक ग्राहक काम आणि मनोरंजन करतात. अनेक उद्योग व्यवसायालासुद्धा नेटवर्कची आवश्यकता असते. ऑनलाईन कामासाठी अनेकांनी नेटवर्कची साधने घेतली आहेत. मात्र, सातत्याने निर्माण होणाऱ्या रेंजच्या समस्येमुळे कामात व्यत्यय येत आहे. तीन-चार तास एकसारख्या खंडित रेंजमुळे अतिमहत्त्वाचे फोन अथवा अन्य कामांना खीळ बसल्याचे ग्राहक सांगतात. त्यामुळे लाखोंच्या संख्येने ग्राहक असलेल्या मोबाईल कंपन्यांनी रेंज आणि नेटवर्कची समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.
.....
चौकट...
दाद कोणाकडे मागायची?
ग्रामीण भागातील ग्राहक मोबाईल आणि इंटरनेटचे रिचार्ज स्थानिक विक्रेत्यांकडून मारतात. रेंजच्या प्रॉब्लेममुळे सामान्य ग्राहक विक्रेत्यांकडे चौकशी करतात. मात्र, विक्रेत्यांनाही याबाबत फारशी माहिती नसते. कंपनीच्या ग्राहक प्रतिनिधीशी बोलायचे झाल्यास नेटवर्क नसते, त्यामुळे दाद कोणाकडे मागायची? याचे उत्तर मिळवण्यात असंख्य ग्राहकांची प्रतीक्षा कायमच राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com