

1663
मौजे सांगाव ः येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालयाची नियोजित इमारत.
..........
आयुर्वेदिक महाविद्यालयाचे
मौजे सांगावला आज भूमिपूजन
कसबा सांगाव, ता. ९ ः वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून होत असलेल्या मौजे सांगाव (ता. कागल) येथील नियोजित शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालयाचा कोनशिला व भूमिपूजन समारंभ गुरुवारी (ता.१०) होणार आहे. इंदिरानगर परिसरात कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
अडीच एकर जागेत ३८७ कोटी रुपये खर्चून १०० बेडचे अत्याधुनिक व सर्व सेवासुविधांनी युक्त रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय मुला-मुलींचे वसतिगृह आणि १५ सुसज्ज विभाग होणार आहेत. मौजे सांगावमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या निधीतून ५ कोटी ८७ लाख रुपयांच्या विविध कामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळा होणार आहे. कार्यक्रमासाठी माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल चौकात होणार आहे. अंतर्गत रस्ते, रस्ते काँक्रिटीकरण, इंदिरानगर येथील सांस्कृतिक हॉल, बंदिस्त गटर्स व काँक्रिटीकरण गाव भाग, स्टॅन्ड एरिया कॉंक्रिटीकरण व सुशोभीकरण, इंदिरानगर काँक्रिटीकरण, ग्रामपंचायत इमारत नूतनीकरण, म्हसोबा मंदिर, विठ्ठल मंदिर सुधारणा, विठ्ठल वाचनालय इमारत आदी कामांचा यात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.