कसबा सांगाव: कागल एम आय डी सी मधील अतिक्रमणे हटविली

कसबा सांगाव: कागल एम आय डी सी मधील अतिक्रमणे हटविली
Published on

कागल एमआयडीसीतील
अतिक्रमणे हटविली

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. १२ ः कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या रेमंड चौकातील खाद्यपदार्थ, किरकोळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर यांच्याकडून ही कार्यवाही करण्यात आली.
रेमंड चौक, अंतर्गत रस्ते यासह जी ब्लॉकमधील भूखंड क्रमांक ७५ आणि ७६ मधील अतिक्रमणधारकांवर कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
कागल एमआयडीसीमधील रेमंड चौकासह अनेक भागात खाद्यपदार्थ, किरकोळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या होत्या. यामुळे सातत्याने वाहतुकीस अडथळा होत होता. अनेक वेळा नोटिसा देऊनही अतिक्रमणे काढली जात नव्हती. परिणामी औद्योगिक विकास महामंडळाकडून धडक कारवाई करण्यात आली. यावेळी खाद्यपदार्थ, शीतपेय विक्रेते यासह अनेक खोकीधारकांनी स्वतःहून हातगाड्या काढून घेतल्या. उर्वरित अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली. कारवाईत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षक तब्बसूम मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com