कसबा सांगाव: मौजे सांगाव येथील जिल्हा उपरुग्णालयाच्या कामास सुरुवात

कसबा सांगाव: मौजे सांगाव येथील जिल्हा उपरुग्णालयाच्या कामास सुरुवात
Published on

1766
मौजे सांगाव ः येथे जिल्हा उपरुग्णालयाच्या कामास सुरुवात झाली आहे.
.....
जिल्हा उपरुग्णालयाच्या कामास
मौजे सांगावमध्ये प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. १२ ः मौजे सांगाव (ता. कागल) येथील इंदिरानगर परिसरात १०० बेडच्या जिल्हा उपरुग्णालयाच्या कामास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्‍घाटन झालेल्या या रुग्णालयाच्या कामाची निविदा निघाली असून, संरक्षक भिंतीच्या पाया खोदाईचे काम सुरू आहे.
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत अडीच एकर विस्तीर्ण जागेत १०० बेडचे अत्याधुनिक व सर्व सुविधांयुक्त रुग्णालय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले होते. त्याचे प्रत्यक्षात काम आता सुरू झाले आहे. ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण रुग्णालयांतर्गत अतिदक्षता, औषधे, शस्त्रक्रिया, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूती, अस्थिरोग, बालरोग, पॅथॉलॉजी, ऑपरेशन थिएटर ३, डायलेसिस, रेडिओलॉजी - सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्स-रे आदी विभाग सुरू होणार आहेत. या सर्व आरोग्याच्या सोयींचा परिसरासह सीमाभागातील अनेक लोकांना लाभ होणार आहे.
...
कोट...
विधानसभा निवडणुकीपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले आहेत. यापैकी येथे होत असलेले रुग्णालय आहे. लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी हे सुसज्ज हॉस्पिटल सुरू होईल. सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या मुश्रीफ यांच्या रुग्णसेवेतील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.
- युवराज पाटील, संचालक, गोकुळ दूध संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com