कसबा सांगाव: युथ गेम्स स्पर्धेत शेती व्यवसाय विद्या मंदिराचे उल्लेखनीय यश

कसबा सांगाव: युथ गेम्स स्पर्धेत शेती व्यवसाय विद्या मंदिराचे उल्लेखनीय यश
Published on

1770
कसबा सांगाव ः राज्यस्तरीय यूथ गेम्स स्पर्धेत येथील विजेत्या शेती व्यवसाय विद्या मंदिरच्या खेळाडूंसह शिक्षक सचिन जाधव..
................
राज्यस्तरीय यूथ गेम्समध्ये
कसबा सांगाव शाळेचे यश

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. १८ ः डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय यूथ गेम्स स्पर्धेत कसबा सांगाव येथील शेती व्यवसाय विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एका सुवर्णपदकासह १२ पदके पटकावली. स्पर्धेत दहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
थ्रो बॉल क्रीडा प्रकारात रोहिणी संजय पाटील हिने २२ मीटर फेक करत सुवर्णपदक जिंकले. १० वर्षांखालील ४ बाय ५० रिले (मुली) क्रीडा प्रकारात रोहिणी संजय पाटील, रितू हर्षवर्धन कोरे, तन्वी अतुल टाकळे, प्रांजली कुमार दिवटे यांनी रौप्यपदक पटकावले. ४ बाय ५० मिक्स रिलेत सर्वेश सचिन स्वामी, प्रणव भरत माने, रोहिणी संजय पाटील, रितू हर्षवर्धन कोरे यांनी रौप्यपदक मिळविले. १२ वर्षांखालील ४ बाय १०० रिलेत (मुली) तन्वी उमेश विभूते, ऋतुजा संपतराव भवाने, रितू हर्षवर्धन कोरे, रोहिणी संजय पाटील यांनी ब्राँझपदक मिळविले. खेळाडूंना मुख्याध्यापक बाळासाहेब निंबाळकर, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांचे प्रोत्साहन, तर सचिन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com