कसबा सांगाव: गोकुळचे म्हैस दूध हा ब्रँड..
1857
मौजे सांगाव ः येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप करताना नवीद मुश्रीफ, युवराज पाटील, राजेंद्र माने, विजयसिंह पाटील आदी.
..........
म्हैस दूधवाढीसाठी विविध
योजना अमलात आणणार
नवीद मुश्रीफ ः मौजे सांगावात दूध संस्थांना वस्तूंचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. २४ ः ‘मागणीच्या तुलनेत म्हैस दुधाचा पुरवठा वाढविणे गरजेचे आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांत गोकुळच्या म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे. म्हैस दूध गोकुळचा ब्रँड आहे. हा ब्रँड वाढीसाठी विविध योजना अमलात आणण्यासाठी प्रयत्न करू,’ असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले.
मौजे सांगाव (ता. कागल) येथे बांधकाम कामगारांना भांडी संच, वारकरी दिंडीला जीवनावश्यक साहित्य, गोकुळमार्फत दूध संस्थांना विविध वस्तूंचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या जनावरांचा विमा उतरवणे, दूध खरेदी अनुदानात वाढ करणे याबाबत संघाने सकारात्मक काम केले आहे. अमूल दूध संघाच्या आव्हानाला यशस्वीरीत्या सामोरे जाऊन गोकुळला अग्रस्थानी आणू.’
युवराज पाटील म्हणाले, ‘नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाच्या काळात दूध संकलनाचा २० लाख लिटरचा टप्पा निश्चितपणे पार करू. राजकारणात मिळालेल्या संधीच्या माध्यमातून सामान्य लोकांची कामे केली आहेत. जनहिताचे काम करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू.’
गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवीद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना बँकेमार्फत ३० हजार रुपये कर्जाचे मंजुरीपत्र, पंढरपूर येथे दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना साखर, दूध पावडर व रेनकोट वाटप करण्यात आले. सरपंच विजयसिंह पाटील, रमेश तोडकर, महेश चौगुले, रणजित कांबळे, युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, दूध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण पास्ते यांनी प्रास्ताविक केले. के. आर. पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.