

01974
कागल पंचतारांकित औद्योगिक
वसाहतीत अतिक्रमणविरोधी कारवाई
कसबा सांगाव, ता. ७ ः कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमण करून उभारलेली अनेक खोकी, टपऱ्या, शेड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून काढण्यात आले.
मंगळवारी (ता. ७) सकाळी दहाच्या सुमारास अतिक्रमणविरोधी कारवाईस सुरुवात झाली. चहा, नाष्टा, जेवण आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी उभारलेली खोकी, रेमंड चौक, फ्रॉस्टी चौक यासह अंतर्गत रस्त्यावरील अनेक टपऱ्या, विविध कंपन्यांनी उभारलेले अनधिकृत, अतिक्रमित पार्किंग शेड, वाहतुकीसाठी अडथळा करत असलेले विविध फलक हटविले. जवळपास ५० हून अधिक ठिकाणचे अतिक्रमण स्टॉल, नाष्टा सेंटर खोकी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. पाच ते सहा ठिकाणी कंपनी पार्किंग शेडही काढण्यात आले. कारवाईची चाहूल लागताच अनेकांनी स्वतःहून आपापली खोकी, गाड्या वसाहती बाहेर नेऊन ठेवल्या. कारवाईदरम्यान अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यासह सिल्व्हर झोन परिसरात अतिक्रमण काढण्याचे काम दिवसभर सुरू होते. औद्योगिक महामंडळाकडून कार्यकारी अभियंता ईराप्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. उपअभियंता अमित भुरले, रोहन पाटील, कनिष्ठ अभियंता श्रद्धा पाटील, उमेश कोष्टी, दिनेश अंबोरे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मधाळे, पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.