शैक्षणिक साहित्याचे वाटप

शैक्षणिक साहित्याचे वाटप

‘एक वही समाजबांधवांसाठी’अंतर्गत २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
कडगाव ता ११ : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली तरीही धनगर वाड्यावर मूलभूत सोयी-सुविधा पोचल्याच नाहीत, असे प्रतिपादन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केले. ते तांबाळे (ता. भुदरगड) येथे एक वही समाज बांधवासाठी.. या उपक्रमार्तगत शैक्षणिक साहित्याचे वाटपप्रसंगी बोलत होते. यावेळी भुदरगड तालुक्यातील २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी तांबळेश्वर हायस्कूल ताबाळे, विद्यामंदिर वाण्याचीवाडी, मेघोली, जोगेवाडी, वासनोली हायस्कूल, वासनोली, शिवडाव धनगरवाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक संतोष भोसले, यशवंत क्रांतीचे तालुकाप्रमुख सगु कात्रुट, शिवाजी पाटील, यु. पी. घुगरे, प्रवीण पार्टे, विजय आदित्य, बाळकृष्ण तवटे, प्रकाश सांडुगडे, विजय वास्कर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com