ठिबक अनुदानासाठी हेलपाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठिबक अनुदानासाठी हेलपाटे
ठिबक अनुदानासाठी हेलपाटे

ठिबक अनुदानासाठी हेलपाटे

sakal_logo
By

ठिबक अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे
केंद्राचे आले, राज्याचे अद्याप प्रलंबित; तातडीने कार्यवाहीची मागणी
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ३ : जिल्ह्यात राज्य शासनाकडून येणारे ठिबक अनुदान प्रलंबित आहे. यामुळे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी कृषी खात्याकडे हेलपाटे मारत आहेत. जिल्ह्यात हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून तातडीने अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
जिल्ह्यात ऊस प्रमुख पीक आहे, तसेच गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांत ठिबक पद्धतीने पिकाला पाणी देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
अतिपाण्याच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. मजूर टंचाई असल्यामुळे शेतकरी आता ठिबककडे वळला असून, जिल्ह्यात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र ठिबक खाली आले आहे.
सन २०२०-२१ मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग शेतकऱ्यांसाठी ठिबक अनुदान एक कोटी ७१ लाख आले होते. यामध्ये सुमारे ९०० लाभार्थी शेतकरी होते. ठिबकसाठी केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असले तरी राज्य शासनाकडून अनुदान प्रलंबित आहे. २०२१-२२ मध्ये ३५ शेतकऱ्यांचे सुमारे २५ लाख, २०२२-२३ सुमारे एक हजार शेतकऱ्यांचे सुमारे दीड कोटी रुपये अनुदान प्रलंबित आहे. यावर्षी सुमारे ८०० हेक्टर क्षेत्र ठिबक खाली आले आहे. ठिबक सिंचनामुळे उसाचे हेक्‍टरी उत्पादन वाढले आहे. पाण्यात बचत होत आहे. खतांच्या किमती वाढल्या. या वेळेला कमी खतात व कमी पाण्यामध्ये शेतकरी पीक घेत आहेत. त्यामुळे अनुदान लवकर मिळावे, अशी मागणी होत आहे.
-------------
चौकट
अल्पभूधारकांना अनुदान हवे
जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे लहान क्षेत्रावर ठिबक आणणे शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा लहान शेतकऱ्यांसाठी २०१३-१४ मध्ये अनुदान देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र, हे परिपत्रक पुन्हा पुनर्जीवित करून अशा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जावे, अशी मागणी होत आहे.
-------------स्वखर्चातून उभारणी
शासनाकडून ठिबक सिंचनला वेळेवर अनुदान मिळत नाही, यामुळे अनेक शेतकरी विनाअनुदानच स्वखर्चातून ठिबक सिंचन यंत्रणा उभारत आहेत.
----------------
कोट
वर्ष झाले, सुमारे दीड लाख रुपये ठिबकचे अनुदान प्रलंबित आहे. शेतकऱ्यांचे वेळेवर अनुदान मिळावे.
- निंबराज नाईक-निंबाळकर, नेज, हातकणंगले
-----------------
केंद्राचे अनुदान आले. राज्य शासनाचे प्रस्तावित आहे. चार दिवसांत प्रलंबित अनुदान मिळेल. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने शेती करावी. यामुळे उत्पादन वाढेल आणि पाण्याची बचत होईल.
- बसवराज बिराजदार, विभागीय कृषी सहसंचालक