लेख आमदार पी. एन . पाटील पुरवणी

लेख आमदार पी. एन . पाटील पुरवणी

Published on

निष्ठावंत नेतृत्व

करवीर विधानसभा मतदारसंघासह ग्रामीण भागाचा विकास साधणारे, सहकारातून विविध प्रकल्पांची उभारणी करणारे, काँग्रेसचे निष्ठावंत नेतृत्व, जिल्ह्याचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित...
- कुंडलिक पाटील, कुडित्रे

पक्षाला आणि जनतेला केंद्रबिंदू मानून आमदार पी. एन. पाटील यांनी कार्याला सुरवात केली. २००४ मध्ये सांगरुळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने मतदारसंघाचा विकास साधला होता. दुर्गम अशा राधानगरी भागातही आमदारकीच्या काळात रस्ते, दवाखाने उभे केले आणि सामान्य जनतेच्या दारापर्यंत आरोग्य सुविधा पुरविल्या. आमदारकीच्या काळात दीडशे कोटीहून अधिक निधीतून विकासकामे केली आहेत. ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ अशी त्यांची कामाची पद्धत निराळीच आहे.
सांगरुळ मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा त्यांनी तयार केल्या. ४२ छोटे - मोठे पूल तयार केले. यामुळे दळणवळण व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. शेतीला पाणी मिळू लागले. पिके डौलाने डोलू लागली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची उन्नती सुरू झाली.
आमदार असताना २०० कोटींची तर आमदार नसतानासुद्धा इतर माध्यमांतून २५ कोटींची कामे त्यांनी मार्गी लावली. मतदारसंघात गोरगरीब आणि गरजू वृद्ध नागरिकांना श्रावणबाळ पेन्शन योजनांमधून पेन्शन दिली. अडीअडचणी आणि कोविड लॉकडाऊनच्या काळात या पेन्शनमुळे खऱ्या अर्थाने निराधार नागरिकांना आधार मिळाला. कोविड काळात त्यांनी नागरिकांना आधार देत आरोग्याच्या सुविधा सामान्य रुग्णांपर्यंत पोचवल्या आहेत.

बँकिंगमध्ये...
१९८५ पासून जिल्हा बँकेचे सलग ३१ वर्षे संचालक म्हणून काम पाहिले. ९० ते ९५ या काळात अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण केला. या काळात शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजाने पीककर्ज देण्याचा पहिला निर्णय त्यांनी घेतला. शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना सुरू करून शेतकऱ्यांची उन्नत्ती साधली. गावागावांत काँग्रेसचा कार्यकर्ता तयार करून जिल्ह्यात काँग्रेसची भक्कम भिंत उभी केली. पक्षाची आजपर्यंत त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली.
ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी गावांचा, सेवा संस्थांचा विशेष विकास साधला. बँकेच्या आणि विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज आणि आर्थिक हातभार लागल्यामुळे शेतकऱ्यांची चौफेर उन्नती झाली. आता देण्यात आलेली प्रामाणिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजना आमदार पी. एन. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झाली.
जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. विकासाचा विचार करून आश्वासनऐिवजी कामाचा निपटारा करणे हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
जिल्ह्यात काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी असे दोन पक्ष तयार झाले. याचकाळात जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आणि पक्षविस्तार केला. विकास सोसायटी, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोचवून त्यांनी जिल्हा बँक, श्रीपतरावदादा बँक, वस्त्रोद्योग महामंडळ, दिल्ली सदस्य, राजीवजी गांधी सूतगिरणी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, पाणीपुरवठा व तरुण मंडळे यांच्या माध्यमातून यंत्रणा सक्रिय केली.
भोगावती साखर कारखान्यात विरोधकांनी केलेले आरोप-प्रत्यारोप पाहून पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, संचालक मंडळाने तो मान्य केला नाही आणि आता सर्वच म्हणतात की आमदार पी. एन. पाटील यांच्याशिवाय भोगावती कारखान्याला पर्याय नाही. ही त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.
खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा झाल्याने संस्था बळकट झाल्या. पर्यायाने पैसा, पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीतून उन्नती साधली. शेतकरी, कष्टकरी जनतेचे प्रश्न पाटील यांनी अविरतपणे सोडवले आहेत. टप्प्याटप्प्याने सडोली खालसा ते दिल्ली, असे त्यांनी विकासातून नाते दृढ केले आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जवळचे स्नेही होते . देशमुख यांच्या माध्यमातून पी. एन. पाटील यांनी जिल्ह्यात विकास साधला. प्रत्यक्ष जागेवर न जाता फोनवर काम संपविण्यावर पी. एन. पाटील यांचा भर असतो. त्यांनी विकासकामांचा कधी डांगोरा कधी पिटला नाही. ते जनतेशी थेट संवाद साधत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. एखाद्या नागरिकाचे, कार्यकर्त्यांचे काम पूर्ण करणे यात समाजकारण आहे. आपण समाजकारण करतो. राजकारण आपला पेशा नव्हे असे ते म्हणतात. विकासकामांना प्रसिद्धी देणे म्हणजे मार्केटिंग करणे, असे त्यांचे ठाम मत आहे. अशा या कार्यकर्तृत्ववान, एकनिष्ठ व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


चौकट

*करवीर विधानसभा मतदारसंघात
दीडशे कोटींहून अधिक रकमेची विकासकामे,

* प्रामाणिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळवून दिले
* जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामे
* कोल्हापूर-गगनबावडा रस्ता रुंदीकरणासाठी पाठपुरावा, रस्ताकाम सुरू आहे
* श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतून तालुक्यात महिला, नागरिक, निराधारांना पेन्शन
* कोविड काळात आरोग्य सुविधा पुरवणे, मास्क, सॅनिटायझर देणे, परदेश व इतर राज्यांत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले. कोविडमध्ये पत्रकारांना विमा सुरक्षा मिळण्यासाठी प्रयत्न
* धामणी प्रकल्पाचे प्रलंबित १०५ कोटी मिळवून दिले. वाढीव शंभर कोटींची तरतूद करून प्रकल्पाचे काम सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com