रस्ता रुंदीकरणातील भूसंपादन आणि मोबदला कधी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता रुंदीकरणातील भूसंपादन आणि मोबदला कधी ?
रस्ता रुंदीकरणातील भूसंपादन आणि मोबदला कधी ?

रस्ता रुंदीकरणातील भूसंपादन आणि मोबदला कधी ?

sakal_logo
By

03255

लोगो ः प्रश्न कोल्हापूर-गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा


भूसंपादन किती; मोबदला कधी?
शेतकऱ्यांचे प्रश्‍न; योग्य भरपाई देण्याची मागणी

कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. २४ ः कोल्हापूर-गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात सुरू आहे. रुंदीकरणासाठी वाढीव जागेची जानेवारीत भूमी अभिलेख, करवीरतर्फे मोजणी झाली. रस्त्यात आमच्या जमिनी जाणार किती? भूसंपादन जमिनीचा मोबदला मिळणार कधी? असे प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला दिला जाणार अशी चर्चा असून योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी होत आहे.

भूसंपादन जमीन मोजणीबाबत जानेवारीत करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. उपाधीक्षक भूमी अभिलेख करवीर यांच्या वतीने कॉर्स या आधुनिक मशीन यंत्राद्वारे सॅटेलाईट सिग्नल घेऊन मोजणी केली. शेतकऱ्यांनी वहिवाटीचा नंबर व वहिवाट दाखवली होती. यावेळी रस्त्यात नेमकी किती स्क्वेअर फूट जमीन जाणार; हे मात्र मोजणी कारकुनांनी सांगितले नाही.
बालिंगा, नागदेववाडी, दोनवडेतील जमिनीची मोजणी केली. दरम्यान नॅशनल हायवे खात्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी खांब न लावल्यामुळे दोनवडेतील मोजणी थांबविली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी खांब लावण्यास सुरुवात केली व पुन्हा येथील मोजणी केली. दोनवडेत भोगावती नदीच्या ठिकाणी दुसरा पूल होणार आहे. दरम्यान, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
काही ठिकाणी गरज असेल तेथे बारा मीटरप्रमाणे खांब टाकले आहेत. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पूर्वीच्या रस्त्याच्या जागेतच नवीन रस्ता होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र अनेक शेतकऱ्यांची दहा स्क्वेअर फुटापासून शंभर स्क्वेअर फूट व काही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन जाणार आहे. मात्र नेमकी किती जमीन जाणार याचा खुलासा खात्याने केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची संभ्रमावस्था आहे.

चौकट
भूसंपादनाबाबत शेतकरी अनभिज्ञच
रुंदीकरणात काँक्रीटचा दहा मीटरचा रस्ता केला जाणार आहे. साईडपट्टी आणि गटारी केल्या जातील. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची हद्द रस्त्यापर्यंत आहे. त्यामुळे रुंदीकरणात नेमकी किती स्क्वेअर फूट जमीन जाणार याबाबत शेतकरी अनभिज्ञच आहेत.

कोट
शेतकऱ्यांनी शासकीय मोजणी आणून शेतजमिनी मोजल्या आहेत. मात्र संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी आमच्या पूर्वीचा रस्ता असणाऱ्या जागेतच झाडाच्या आत रस्ता करणार आहोत, असे सांगतात. रुंदीकरणात जमिनी गेल्यास कोकणात दिल्याप्रमाणे आम्हालाही पाचपट मोबदला मिळावा; अन्यथा काम बंद पाडू.
- शिवाजी गुरव, खुपिरे शेतकरी गगनबावडा मार्ग,

कोट
तीन गावांची भूसंपादन मोजणी झाली. चार गावांची होणार आहे. बारा मीटरचा रस्ता होणार असून, जमिनीचा मोबदला महसूल खात्याकडून निश्चित केला जातो.
- तुषार शिरगुप्पी, उपकार्यकारी अभियंता.