Wed, March 29, 2023

कुंभी ऊस बिल
कुंभी ऊस बिल
Published on : 8 March 2023, 5:16 am
‘कुंभी’चे जानेवारीअखेरचे
ऊस बिल वर्ग : चंद्रदीप नरके
कुडित्रे ता. ८ ः कुंभी कासारी कारखान्याचे १६ ते ३१ जानेवारीचे प्रतिटन ३,१०० रुपयांप्रमाणे ऊस बिल, ऊस पुरवठाधारकांचे बँक खातेवर वर्ग केल्याची माहिती माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. चालू हंगामामधील एफआरपी ३,१०० रुपयेप्रमाणे उसाचे एकूण बिल २५ कोटी ०९ लाख १० हजारांची रक्कम ऊस पुरवठाधारकांचे बँक खात्यावर ६ मार्चला वर्ग केल्याचे नरके यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष विश्वास पाटील, संचालक, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने उपस्थित होते.