कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र १९ हजार हेक्टरने वाढले

कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र १९ हजार हेक्टरने वाढले

हेक्टरी उत्पादन घटले; ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात
-
जिल्ह्यात वाढले उसाचे क्षेत्र


कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे ता.९ ः जिल्ह्यात यंदा उसाचे हेक्टरी उत्पादन घटले असले तरी उसाचे क्षेत्र १९ हजार हेक्टरने वाढले असून, एकूण १ लाख ८६ हजार २१५ हेक्टर उसाचे सर्वसाधारण क्षेत्र झाले आहे. यावर्षी आतापर्यंत गाळप हंगामात दीड कोटी टन उसाचे गाळप झाले आहे.
गतवर्षी पाऊसमान चांगले राहिले. यामुळे पूर्व हंगामी उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ७५४ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने उसाची वाढ खुंटली होती. यामुळे क्षेत्र वाढले असले तरी हेक्टरी सुमारे ९ टनाने उत्पादन घटले आहे. तसेच पाऊसमान चांगले राहिल्याने पूर्व हंगामी उसाच्या क्षेत्रात १९४६१ हेक्टरने वाढ झाली आहे. पुढच्या हंगामासाठी एकूण १ लाख ८६ हजार २१५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र कृषी विभागाकडे निश्चित झाले आहे. अंतिम रिपोर्ट १५ एप्रिलनंतर निश्चित होणार आहे.
हातकणंगले तालक्यात २०३६, शिरोळ १४५७, करवीर ९६००, कागल १०६९, गडहिंग्लज १४७९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आडसाली क्षेत्र २२४८३ हेक्टर, पूर्व हंगामी ४१५०३ हेक्टर, सुरू ३६६६९ हेक्टर, खोडवा ६६०१९ हेक्टर क्षेत्र नोंद झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जास्तीत जास्त ९७ टन हेक्टरी उत्पादकता असली तरी यंदा ९ टनाने हेक्टरी उत्पादन घटले आहे. बहुतांश साखर कारखान्यांचे उद्दिष्टपेक्षा लाख, दोन लाख टन गाळप कमी झाले आहे, अशी माहिती साखर कारखाना शेती विभागातील सूत्रांनी दिली. ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात असून, ऊस खोडवा पिकाची चांगली उगवण झाली आहे.


कोट
वातावरणातील बदल, अवेळी पडलेला पाऊस ,अतिवृष्टी यामुळे ऊसाला तूरे आले, आणि हेक्टरी उत्पादन घटले आहे.
-जयवंत जगताप, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे

कोट
या वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांचे नुकसान करणारा ठरला. अवेळी पडलेल्या पावसाने उसाचे एकरी २० टनाने उत्पादन घटले. पुढील हंगामात ऊस उत्पादकांना चार पैसे हातात राहायचे असतील तर ३५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावून देऊ नये.
-धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com