तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती

तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती

करवीर तहसीलदारांच्या
आदेशाला स्थगिती

कुडित्रे; ता. २२ ः राज्य शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल देणाऱ्या करवीर तालुक्याला सक्षम तहसीलदार मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन तहसीलदार हजर झाले. मात्र आदेशाला एकाच दिवसात स्थगिती देण्यात आली असून आता गगनबावडा तहसीलदारांकडे करवीरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि हंगामाच्या तोंडावर तातडीने तहसीलदार मिळावा, अशी मागणी होत आहे.
करवीर तहसीलदार कार्यालय अंतर्गत तालुक्याला तीन आमदार, खासदार, महापालिकेचा काही महसूल,व १३२ गावांतील महसूल कारभार चालतो. मोठ्या प्रमाणावर महसूल या तालुक्यातून राज्य शासनाला मिळतो. यापूर्वी तहसीलदार शीतल भामरे मुळे यांनी काम पाहिले. १३ एप्रिल रोजी त्यांची बदली झाली आहे . तर १३ एप्रिल रोजी मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांची नियुक्ती झाली होती. यानंतर एक आठवडा त्यांनी करवीर तहसीलदार म्हणून काम केले. दरम्यान १२ एप्रिल रोजी करवीर तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचा आदेश प्राप्त झाला, यामुळे पुन्हा तहसीलदार पद रिक्त राहिले. यानंतर २० एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गगनबावडा तहसीलदार शैलजा पाटील यांच्याकडे करवीर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान नवीन तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती का देण्यात आली, अशी चर्चा खाते अंतर्गत सुरू झाली आहे. दरम्यान मोठा आवाका असणाऱ्या या तालुक्याला सक्षम तहसीलदार मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या तालुक्याला दबावाखाली तहसीलदारांना काम करावे लागते, यामुळे येथे येण्यास नाराजी असते. येथे येण्यासाठी खिसाही खाली करावा लागतो, अशी चर्चा आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे ,नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती आणि अनेक प्रश्न आहेत. यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तहसीलदार मिळावा, पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com