स्फोट,अभिलेख जळून खाक

स्फोट,अभिलेख जळून खाक

03469

बालिंगाः ग्रामपंचायतीमधील जळालेले अभिलेख.
...

बालिंगा ग्रामपंचायतीचे दप्तर जळून खाक

मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आगः दरवाजे, खिडक्या बंद असल्यामुळे दस्तऐवज खोलीत स्फोट


बालिंगा, ता.२९ः बालिंगा ग्रामपंचायत अभिलेख कक्षाला मध्यरात्री आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातच स्फोट झाला आणि या स्फोटात ऑफिसच्या खिडक्याच्या काचा फुटल्या. या आगीत दस्तऐवज अभिलेख जळून खाक झाले. ग्रामपंचायत व सरपंच यांच्यावतीने शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र माजी सरपंच यांनी ही आग जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप केला असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
बालिंगा ग्रामपंचायतीची इमारत मध्यवस्तीत आहे. सुमारे अडीच हजार मिळकतधारक खातेदार आहेत. इमारतीत खाली तलाठी कार्यालय व एक लहान अभिलेख खोली आहे. या खोलीत मागील ५६ वर्षांपासूनचे दस्तऐवज कागदपत्रे ठेवण्यात आली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास अभिलेख कक्ष खोलीत अचानक आग लागली. यावेळी दरवाजे, खिडक्या बंद असल्यामुळे धूर आणि गॅस निर्माण होऊन अडीचच्या सुमारास स्फोट झाला. औषध फवारणी करणारे फॉगिंग मशीन याच खोलीत होते. आवाज इतका मोठा होता की, इमारतीच्या सभोवतालचे नागरिक या आवाजाने जागे झाले.
या स्फोटात खिडक्यांच्या काचा फुटल्या. धुराचे लोट आणि आग खिडकीतून बाहेर येऊ लागली. यावेळी सरपंच व काही सदस्य घटनास्थळी आले. त्यांनी करवीर पोलिसंना कळविले व अग्निशामक दलाची गाडी बोलावली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर सकाळी ४ च्या सुमारास आग आटोक्यात आली. या आगीत फर्निचर, कपाट, पावत्या, दस्तऐवज जळून खाक झाले.
...

तलाठी कार्यालयातील प्रिंटर जळाला
‘१ ते ३३ नमुने असलेले कामकाज जळाले आहे, त्यामध्ये प्रोसिडिंग, हजेरी पत्रक अशी कागदपत्रे होती. कागदपत्रे जळाल्यामुळे ग्रामस्थांना कागदपत्रे देता येणार नाहीत’, अशी माहिती ग्रामसेवकांनी दिली. दप्तर जळाल्याने कर्ज प्रकरणाला अडचणी निर्माण होणार आहेत.
सुदैवाने तलाठी कार्यालयातील दप्तर वाचले आहे.
...


‘शॉर्टसर्किटमुळे दप्तर ठेवलेल्या खोलीला आग लागली. दस्तऐवज जळाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला बोलावले. महावितरण कंपनीलाही कळविले.
सचिन माळी, सरपंच

...
‘अभिलेख दप्तर खोलीत वीज कनेक्शन सुरू नव्हते. शॉर्टसर्किट ५६ वर्षांत झाले नाही, आताच कसे झाले. आम्ही आणि नागरिकांनी माहिती अधिकाराचे अर्ज दिले होते, यातून हे दप्तर पेटवले असण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी व्हावी.

राजेंद्र चौगले, माजी सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com