लंपीच्या भरपाईबाबत
राज्यशासन उदासीन

लंपीच्या भरपाईबाबत राज्यशासन उदासीन

लम्पीच्या भरपाईबाबत
राज्य शासन उदासीन
अद्याप निर्णय नाही; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ६ : यंदा लम्पीने जनावरे दगावल्यास अनुदान देण्यास राज्य शासन उदासीन असून अद्याप एप्रिल, मे संपला तरी अनुदानाबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी, राज्य शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी लम्पी आजाराने दुभती जनावरे दगावली. दूध उत्पादनही घटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मार्चपर्यंत दोन लाख ८३ हजार जनावरांना लसीकरण झाले होते.
जिल्ह्यात एकूण आठ लाख ८८ हजार ११ पशुधन आहे. यामध्ये गाईंची संख्या दोन लाख ८३ हजार आहे. गेल्या वर्षी राज्यासह जिल्ह्यात लम्पी आजार सुरू झाला. यामध्ये जिल्ह्यात १७ हजार ४३८ जनावरांना लसीकरण करण्यात पशुवैद्यकीय विभागाला यश आले. यामध्ये १६ हजार ४०० जनावरे आजारापासून बरी झाली आहेत, तर १२८८ जनावरे मृत्युमुखी पडली. या मृत जनावरांबाबत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आतापर्यंत जिल्ह्यात तीन कोटी ३२ लाख ४२ हजार इतका लाभ दिला आहे.
दरम्यान, अद्याप राधानगरी तालुक्यात लम्पीने बाधित जनावरे आढळत आहेत. याबाबत पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधला असता एकूण दोन महिन्यांत फक्त १८ जनावरांना लम्पी झाल्याचे सांगण्यात आले; मात्र सध्या भरपाईबाबत सकारात्मक स्थिती नाही.
---------------
चौकट
लम्पी झालेल्या अनेक जनावरांची शेतकऱ्यांनी शासनाकडे नोंद केली नसल्यामुळे अनुदान मिळालेले नाही. यंदा अनुदान देण्याबाबत राज्य शासन उदासीन असल्यामुळे जनावरे दगावल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत येणार आहेत.
------------------
कोट
गेल्या वर्षी लम्पीबाबत सतर्क राहून काम केले. १२५० गावांत पोस्टर लावले, लसीकरण केले. यावर्षी लम्पीने जनावरे दगावल्यास एप्रिलनंतर अनुदानाची तरतूद नाही. अनुदानासाठी मागणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. सप्टेंबरनंतर लस सुरू होईल.
- डॉ. वाय. ए. पठाण, आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com