आंदोलन  , कोल्हापूर गगनबावडा रस्ता वाहतुकीस पूर्ववत करावा

आंदोलन , कोल्हापूर गगनबावडा रस्ता वाहतुकीस पूर्ववत करावा

Published on

03821
...

कोल्हापूर-गगनबावडा रस्ता
वाहतुकीस पूर्ववत करावा

आंदोलकांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आज निर्णयाचे आश्वासन

बालिंगा ता. २६ : दोनवडे-बालिंगा येथील पूल कमकुवत असल्याच्या कारणावरून रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, नागरिकांचे हाल होत आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला पूर्ववत करावा, यासाठी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. राज्यमार्ग खात्याला गुरुवारी (ता. २७) अकरापर्यंत अल्टिमेट दिला आहे. यानंतर बॅरिकेट काढून रस्ता वाहतुकीस खुला करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दूरध्वनीवरून गुरुवारी दुपारी बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी कार्यकारी अभियंता के. डी. मुदाळे, उपअभियंता आर. बी. शिंदे, सहाय्यक अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपअधीक्षक संकेत गोसावी, विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

सूर्यवंशी म्हणाले, ‘सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील व पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतील विद्यार्थी, नागरिक, नोकरदार, रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेला पर्यायी मार्ग धोकादायक आहे. गुरुवारी अकरापर्यंत रस्ता खुला करावा अन्यथा बॅरॅकेट काढून वाहतूक सुरू करू.’
दरम्यान, पुलाच्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुलाच्या कमानीला पाणी लागल्यास धोकादायक ठरू शकते, असे सांगितले. त्यावर जुना पूल आहे तर ३५ वर्षे पुलावरून वाहतूक कशी होती, वर्षभर रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. या कालावधीत पर्यायी पूल का बांधला नाही, पुलाखाली मुरूम टाकल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे, असे विविध प्रश्न करत आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी वाकरेचे सरपंच सर्जेराव शिंदे, साबळेवाडीचे सरपंच चंद्रकांत पाटील, संभाजी आंबी, सुनील कापडे, संजय पाटील, योगेश पाटील ,रवी पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.