खुपिरेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या 
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

खुपिरेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

खुपीरेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कुडित्रे, ता. ११ : खुपीरे (ता. करवीर) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९६-९७ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. २७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
खुपीरे येथे सांस्कृतिक सभागृहात स्नेहमेळावा झाला. प्राचार्य सी. एम. सातपुते अध्यक्षस्थानी होते. मृत्यू पावलेल्या शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली. सर्वांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत माजी विद्यार्थीनींनी सोनचाफ्याची रोपे भेट दिली. प्राचार्य सी. एम. सातपुते यांच्यासह इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कल्पना रेणके, संदीप पाटील, मारुती पाटील, संपदा हराळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सागर पाटील, प्रशांत पाटील, डॉ. संदीप पाटील, सचिन कुंभार, पांडुरंग हराळे, दिलीप सुतार, भगवान जगदाळे, नंदिनी चव्हाण, रूपाली वरपे, संदीप गडकरी, प्रकाश खोंद्रे, आनंदा कांबळे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. संदीप पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com