लेख,

लेख,

डोके
श्री ज्योतिर्लिंग व मरगुबाई, दोनवडे यात्रा विशेष
--

फोटो 04994, 04993, 04995 (छायाचित्रे जयवंत निगडे )


कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांत
राज्यात नावाजलेलं गाव

''दोनवडे'' हे गाव पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गाव आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांत राज्यात नावाजलेलं गाव आहे. येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग व मरगुबाई यात्रा होत आहे. यानिमित्त..
-कुंडलिक पाटील, दोनवडे
--

दोनवडे कोल्हापूर शहरापासून अगदी ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे. एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यासह राज्यात नावाजले आहे. गावाला दोनवडे हे नाव '' दोन वडाच्या'' म्हणजे गावात असणाऱ्या प्राचीन वटवृक्षावरून, वडाच्या झाडावरून पडले आहे.
गावात राहणारे वंशज हे मुंगीपैठण येथील देशमुख-पाटील घराण्यातील आहेत. पुरातन काळी त्यांच्या वंशजांनी मुंगीपैठण तेथील नागरिकांसोबत काही कारणांने हे सर्व लोक मजल-दरमजल करीत त्यापैकी काही लोक भोगावती नदीकाठी स्थिर झाले व त्यांनी आपली वस्ती उभारली.
पुरातन काही गावे, शहरे ही नदीकाठीच वसली आहेत. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. सुपीक जमीन व शेतीसाठी उपलब्ध होत गेलेले पाणी आणि पूरक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे लोकसंख्या वाढत गेली व लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले. कालांतराने गावाला नाव प्राप्त झाले ''दोनवडे''. पण, नावाच्‍या इतिहासाला फक्त पूर्वजांनी सांगितलेली माहिती हाच पुरावा आहे. पुढे गाव वसले आणि ज्योतिर्लिंग मंदिरही उभारले गेले. पूर्वजांनी गावाबाहेर कौलारू रूपात मंदिर बांधले. दगडी पाषाणातील जोतिबाच्या मूर्तीची स्थापना केली. मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. हे मंदिर अत्यंत सुंदर, प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लोकांची बसण्याची व्यवस्था व डाव्या बाजूला आणखी बसण्याची व्यवस्था बांधीव होती.
जुने मंदिर लाकडी रूफ काम व लाकडी खांबावर भार पेललेले मंदिर होते. मध्यभागी फक्त जोतिबाची एकच मूर्ती होती. मुख्य मंदिराच्‍या मागे चिंचेचे खूप मोठे झाड होते. मंदिराच्या उजव्या बाजूला सुरुवातीला गणपती व हनुमान यांची छोटी मंदिरे होती. शेजारी पांढऱ्या चाफ्याचे खूप जुने झाड होते. त्याकाळी प्रत्येक मुख्य सणाला मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम चालत असत. जुन्या मंदिराच्या समोरील दीपमाळेखालील दगडावर हे बांधकाम १८९२ मध्ये पूर्ण झाल्याचा एक शिलालेख होता. तो सध्या रस्त्याच्या खाली गेला आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार होत गेल्याच्या खुणा आपल्याला पाहायला मिळतात. गावातील सर्व लहान-थोर ग्रामस्थांनी आपापल्या परीने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्रमदान, धनदान, आदी माध्यमातून भरीव मदत केली आहे. गावातील महादेव तालीम मंडळ व हनुमान तालीम मंडळ यांनी गावचे नाव कुस्ती, दांडपट्टा, झांजपथक, लेझीम पथक, आदी क्षेत्रांत उज्ज्‍वल केले आहे. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडित ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद सुरू आहे.
गावातील विविध संस्था नागरिकांनी, माजी सरपंच यांनी आपापल्या कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे चालवून नावारूपाला आणल्या आहेत. विशेष म्हणजे, गावातील श्री जोतिर्लिंग मंदिर विकास समितीच्या माध्यमातून २००० पासून मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. दसऱ्याला सोने लुटण्याची पूर्वीची बंद पडलेली पद्धत, गावचा उरूस सुरू करण्याचे पूर्ण श्रेय या समितीला आहे. पूर्वीच्या पद्धतीने विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा गेली २० वर्षे अखंडितपणे जपला आहे.
श्रावण महिन्यात गावातील दोन्ही तालमींकडून गेली कित्येक वर्षे महाप्रसाद वाटपाचे काम अखंडितपणे सुरू आहे. तसेच स्वामी समर्थ मंडळाकडून गेली १३ वर्षे दत्त जयंतीला महाप्रसादाचे वाटप सुरू आहे. वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी गावतळे आहे. आजमितीस या तळ्यातील पाणी केव्हाच आटलेले नाही. जोतिर्लिंग यात्रा कमिटीने मंदिराच्‍या रंगरंगोटीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे.
आरतीचे गावकरी, मानकरी, पाटील भावकी, मगदूम भावकी, चौगले भावकी हे असतात. पालखीचे मानकरी, बाळासो गुरव, पी. एम. गुरव, मच्छिंद्र लोहार, निवास सुतार, पांडुरंग कोंडिबा जाधव, पांडुरंग सातपुते, वाजंत्रीमान नंदिवाले, शिवाजी गायकवाड, संतराम खुपीरकर, धनगर, नंदीवाले यांचाही सहभाग असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com