नदीपात्रातील मुरूमामुळे महापुराचा घोका , कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरण

नदीपात्रातील मुरूमामुळे महापुराचा घोका , कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरण

Published on

05004

दोनवडेत नवीन पुलाचे काम सुरू
मॅट यंत्राद्वारे पायाखोदाई; नदीपात्रातील मुरुमामुळे महापुराचा घोका

सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे, ता. १६ : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. नवीन पुलाच्या कामासाठी पायाखोदाई करणे व पाईल टाकण्याच्या कामास विलंब झाला आहे. यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत होता. आज आधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्यास सुरुवात झाली. पावसाळ्यात पंधरा-वीस दिवसांत पुलाचे काम बंद पडणार आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मुरूम टाकला असून मुरुमामुळे पुराचा धोका निर्माण होणार आहे.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. दोनवडे-बालिंगा दरम्यान पुलाची आयुर्मर्यादा संपल्यामुळे पर्यायी पूल बांधण्यात येणार आहे. मात्र वर्षभर पुलाचे पाईल टाकण्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण होणार नाही. गतवर्षी कमान, आर्चला पाणी लागल्यानंतर पंधरा दिवस पुलावरून वाहतूक बंद केली होती. यामुळे नागरिकांना नाहक त्रास झाला. यावेळी नागरिकांनी आंदोलन करून पुलावरून वाहतूक सुरू केली होती. गतवर्षी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. मात्र वर्षभर पाईल टाकण्याचे कामसुद्धा पूर्ण झालेले नाही. यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी वाढल्यानंतर यंदा पुलावरून वाहतूक बंद करावी लागणार आहे. संबंधित ठेकेदाराला राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या वतीने अनेकदा नोटीस बजावली आहे. मात्र तरीही काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर आज आधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्यास सुरुवात केली आहे. मशीनच्या साह्याने पाया खोदण्याचे काम होईल; मात्र पंधरा-वीस दिवसांत पावसाला सुरुवात झाल्यानंतर पुलाचे काम थांबणार आहे. नदीपत्रात वाहने आत जाण्यासाठी व पाईलसाठी मोठ्या प्रमाणावर मुरुम टाकला आहे. मुरुमामुळे पुराचे पाणी वाढून पुलाला धोका तसेच महापुराचाही धोका निर्माण होणार आहे. हा मुरूम काढावा, अशी मागणी होत आहे.

कोट
आधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील मुरूम काढला जाणार आहे.
- शुभम पाटील, कनिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com