

05506
महिला सबलीकरणाला
राज्य शासनातर्फे बळ
चंद्रदीप नरके; आशा, अंगणवाडीसेविकांचा सन्मान
कुडित्रे; ता. २९ : ‘‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, कोरोना काळात केलेले काम यासह शासनाच्या विविध योजनांत आशासेविका, अंगणवाडीसेविका, मदतनिसांनी मोठे योगदान दिले. कामातील तत्परता यातून महिला सक्षम असल्याचे सिध्द झाले आहे. महिला सक्षमीकरणाचे काम शासनाने केले. महिला शासनाला सक्षम करतील,’’ असे मत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले.
कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी हॉलमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी राबविलेल्या आशा मदतनीस, सेविका व बचतगट प्रवर्तक महिलांनी योगदान दिल्याबद्दल सन्मान कार्यक्रमात नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुप्रिया पाटील होत्या. यावेळी राजलक्ष्मी नरके, शैलजादेवी नरके, अजित नरके यांची उपस्थिती होती.
यावेळी नरके म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात महिला व शेतकरी सक्षमीकरणासाठी धडाकेबाज निर्णय घेतले. मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण, लेक लाडकी लखपती, कृषी पंप वीजमाफी, वयोश्री, महिला बचत गटांना अर्थसाहाय्य अशा टॉपटेन योजना जाहीर केल्या. योजना राबविणाऱ्या अंगणवाडी व आरोग्यसेविका मदतनीसांचा सन्मान हे कर्तव्य आहे. माझ्या घराची दारे २४ तास या बहिणींसाठी खुली असतील.’.
अर्चना पाटील म्हणाल्या, ‘काम करणाऱ्या नेत्यात विठ्ठलाचे रूप असते तेच नरके यांच्यात दिसते.’ सुरेखा तिसंगीकर म्हणाल्या, ‘माणुसकीचे प्रतीक चंद्रदीप नरके आहेत. महापूर, अपघात तसेय जिथे अडचणी आहेत तेथे पोचून नरके भाऊ सोडवितात.’ यावेळी ललिता बाटे, योजना पाटील (भुयेवाडी), अर्चना पाटील (शिये), वर्षा जाधव, अर्चना भोसले (मणदूर) यांनी मनोगत व्यक्त केले. अजित नरके यांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.