राज्य शासनाकडून डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान मधून ५८ लाख प्राप्त

राज्य शासनाकडून डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान मधून ५८ लाख प्राप्त

Published on

जिल्ह्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीला मिळणार चालना
शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानमधून ५८ लाख प्राप्त

कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे, ता. ६ : विषमुक्त अन्न, प्रदूषणविरहित जमीन आणि पाणी यासाठी व शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेती हाच पर्याय उरला आहे. जिल्ह्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीला चालना मिळणार आहे. कृषी विभाग आत्माअंतर्गत १५० शेतकरी गटांसाठी राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानमधून ५८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून शेतकऱ्यांना नैसर्गिक सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण देऊन प्रतिहेक्टरी पंधराशे रुपये अनुदान दिले जाणार आहे.
जिल्ह्यात कृषी विभाग आत्मा विभागअंतर्गत २०१३/१४ पासून शेतकऱ्यांचे एकूण १७०० गट स्थापन झाले आहेत. यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये दीडशे गट काम करत आहेत. यामध्ये प्रतिगट ५० हेक्टर, असे साडेसातशे हेक्टरपर्यंत क्षेत्र गटांतर्गत जोडले गेले आहेत.
ग्रुपमधून नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. यातून माती परीक्षण, प्रोत्साहन अनुदान अशा योजना राबवल्या जातात. नुकतेच ५८ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यातून प्रतिहेक्टरी पंधराशे रुपये अनुदान गटांना दिले जाणार आहे. २०२३/२४ मध्ये या नैसर्गिक शेती गटांना २१ लाख रुपये खर्च झाला आहे. यावर्षी चार लाख रुपये प्रशिक्षणावर खर्च केला जाईल. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देणे, दुसऱ्या टप्प्यात उत्पादित मालाची विक्री करणे, प्रमाणीकरण करणे, असे उपक्रम राबविले जातील. या दहा गटांतून एक कंपनी स्थापन केली जाईल. यातून १५ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

चौकट
जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्केपेक्षा खाली आले आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा घटक असून जमिनीतील जिवाणूसाठी आणि जीवजंतूसाठी महत्त्वाचे माध्यम आहे. जमिनीची सुपीकता, सच्छिद्रता, जिवाणूंची अभिक्रिया, अन्नद्रव्यांची उपलब्धता, जमिनीचे तापमान, कणांची जडणघडण, खतांचे विघटन यासाठी सेंद्रिय कर्ब एक टक्केपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

कोट
नैसर्गिक सेंद्रिय शेतीसाठी निधी प्राप्त झाला आहे. यातून शेतकऱ्यांना गटांना प्रशिक्षण देणे व विविध उपक्रम राबविले जातील. सेंद्रिय कर्ब प्रमाण वाढले नसल्याने खताची उपलब्धता पिकांना होत नाही. नैसर्गिक शेती अभियानातून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला चालना मिळणार आहे. नैसर्गिक सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय, किंवा जिल्हा प्रकल्प संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा.
- रक्षा शिंदे, आत्मा प्रकल्प संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com