जिल्ह्यात ३८८ योजना पूर्ण , ७८६ जलजीवन मिशन पाणी योजना अपूर्ण,
‘जलजीवन’च्या ७८६ योजना अपूर्ण
फक्त पन्नास कोटीच फंड शिल्लक; पुरवणी आराखड्यात निधीची गरज
कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १३ : जिल्ह्यात जलजीवन मिशन पाणी योजनेची ३८८ कामे पूर्ण झाली असून ७८६ कामे अपूर्ण आहेत. पन्नास ते पंच्याहत्त्तर टक्के काम झालेल्या २२७ योजना आहेत.
वाढीव वस्तीवर येत्या उन्हाळ्यात तरी किमान पिण्याचे पाणी मिळणार का; असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी जनजीवन मिशन योजनांसाठी नोव्हेंबरअखेर सुमारे २३६ कोटींचा फंड उपलब्ध होता, यावेळी फक्त ५० कोटीच उपलब्ध असल्याचे समजते. यामुळे पुरवणी आराखड्यामध्ये अपेक्षित निधी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १ हजार २११ गावांत पाणी नळ योजना मंजूर झाल्या होत्या. यापैकी ३८८ योजना पूर्ण झाल्या असून ७८६ योजनांची कामे सुरू असली तरी या योजना अपूर्ण आहेत. विविध कारणांनी ९ ठिकाणी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत, तर ५३ गावांमध्ये योजनेची वर्क ऑर्डर दिलेली नाही. ३६ गावांत २५ टक्केपर्यंत योजनांचे काम झाले आहे. २५ ते ५० टक्के मध्ये १३२ योजना सुरू आहेत. ५० ते ७५ टक्के काम झालेली २२७ योजना आहेत. ७५ ते ९९ टक्के काम झालेल्या ३६८ योजना आहेत. ६३९ योजनांमध्ये सोलर सिस्टम केली जाणार असून ३१ योजना सोलर सिस्टिम वरील पूर्ण झाल्या आहेत.
ज्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले अशा ठिकाणी गटातटाच्या राजकारणातून या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करून घेण्यास आडकाठी आणली जात असून श्रेय वादात काही योजना अडकल्या आहेत. दरम्यान उन्हाळ्याच्या तोंडावर या योजना पूर्ण होऊन वाढीव वस्तीवर, टंचाई असलेल्या ठिकाणी पाणी मिळणार का,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतींची वसुली थकली आहे. यामुळे वीज बिले थकल्याने महावितरणकडून नवीन नळ योजनेला वीज जोडणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महावितरणने २०२२ पर्यंत ग्रामपंचायत पाणीपुरवठा विजेची बिले माफ केली. पुन्हा यानंतरही विज बिले थकली आहेत.
चौकट.....
ग्रामपंचायत पदाधिकारी मेटाकुटीला
गावांचा विस्तार होताना, योजनाही होत आहेत. मात्र खर्च आणि वीज बिलाचे प्रश्न आहेत. प्रस्तावित सोलर योजना असूनही सोलर बसवता येईनात. वीज बिल, कामगार पगार, पाणी योजनांची गळती काढणे, रस्त्याचे प्रश्न सोडविताना आणि गावगाडा चालवताना ग्रामपंचायत पदाधिकारी मेटाकुटीला आले आहेत.
कोट
३८८ योजना पूर्ण झाल्या आहेत. सर्व योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. २०२५ पर्यंत सर्व योजना पूर्ण होतील.
- अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

