

दहा लाखांच्या केबलची चोरी
कुडित्रे, ता. ७ : करवीर तालुक्यामध्ये कुडित्रे, कोगे, वाकरे परिसरात चोरट्यानी शेतीपंपाचे केबल चोरीचा सपाटा लावला आहे. गस्ती पथकाला सोमवारी रात्री फुलेवाडी, गंगाई लॉन परिसरात गस्त घालताना रस्त्यावर पडलेली गाठोडी सापडली. यात केबल मिळून आल्या,पण चोरटे हाताला लागलेले नसल्याने शेतकऱ्यांच्यात चिंता वाढली आहे.
वाकरे, चिखलीतील पंचगंगा व भोगावती नदीच्या काठावर असलेल्या विद्युत पंपाच्या केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. सोमवारी रात्री पुन्हा कुडित्रे गावातील ६० ते ७० शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या केबल चोरी झाल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री वीजपुरवठा सुरू होऊन शेती पंप सुरू न झाल्याने शेतकरी चौकशी करण्यासाठी नदीकाठावरील विद्युतपंपाकडे गेले असता जवळपास ६० ते ७० शेतकऱ्यांना विद्युतपंपाच्या केबल चोरी झाल्याचे लक्षात आले. यामुळे शेतकऱ्यांच्यात खळबळ उडाली. दहा लाख किंमत होईल एवढ्या या केबल चोरीला गेल्या होत्या. याची माहिती प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी दिली. चोरीच्या प्रकाराबाबत चौकशीसाठी या प्रतिनिधींनी करवीर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता केबल सापडल्याचे समजले. ओळख पटवून केबल घेऊन जाण्याचे शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यातून आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.