टुडे २

टुडे २
Published on

जिल्ह्यात २४६९ शेतकऱ्यांना
मिळणार १३.२८ कोटींचा लाभ
कृषी विभागातील विविध योजना; महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्याचे आवाहन

कुंडलिक पाटीलः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. २७ : राज्यस्तरावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्त्वावर कृषी विभागातील योजनांसाठी राज्यातील शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ४६९ शेतकऱ्यांची निवड झाली असून १३.२८ कोटींचा लाभ त्यांना मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांकडून १० दिवसांत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास तो अर्ज रद्द होणार आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर, तसेच एसएमएस पाठविले आहेत. ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, अशा शतकऱ्यांनी १० दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातर्फे आवाहन केले आहे.
पूर्तता केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लगेचच पूर्व संमती मिळणार आहे. फार्मर आयडीच्या आधारे लॉगिन केल्यानंतर पुढील माहिती मिळू शकेल. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढला नसेल. त्यांनी जवळील सीएससी केंद्रातून काढून घ्यावा.
-
जिल्ह्यातील योजनानिहाय लाभाची निवड व रक्कम
शेती यांत्रिकीकरणात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २७ अर्जांसाठी लाभाची एकूण रक्कम ३२ लाख २५ हजार आहे. तर कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानात १५८६ शेतकऱ्यांना ८ कोटी ५० लाख ११ हजार ४०० रुपये लाभाची रक्कम आहे. सिंचन क्षेत्रात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळेसाठी २६१ शेतकऱ्यांना १ कोटी ३७ लाख ९१ हजार ३५७ रुपये मिळणार आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात १२ अर्जांसाठी ९ लाख ८५ हजार ९६४ लाभाची रक्कम आहे.

सूक्ष्म सिंचन घटक
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक) या अंतर्गत ३७४ अर्जांसाठी १ कोटी ५९ लाख २९ हजार २७६ रुपये लाभाची रक्कम आहे. तर आरकेव्हीवाय शेततळ्याला प्लास्टिक आच्छादनासाठी १४९ अर्जांसाठी ८२ लाख १० हजार ४०२ लाभाची रक्कम आहे. फलोत्पादन घटकांतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ६० अर्जांसाठी ५७ लाख ३८ हजार १५५ रुपयांच्या लाभाची रक्कम आहे. अशा प्रकारे एकूण २ हजार ४६९ अर्जांच्या निवडीनंतर १३ कोटी २८ लाख ९१ हजार ५५४ रुपयांची लाभाची रक्कम जिल्ह्यासाठी आहे.
--
कोट
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर कृषी विभागातील योजनांसाठी राज्यातील शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ४६९ शेतकऱ्यांची निवड झाली असून, १३.२८ कोटींचा लाभ त्यांना मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, अशांनी १० दिवसांत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
- जालंधर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com